Solapur News : ज्येष्ठ नेते शरद पवार हे आमच्यासाठी दैवतच आहेत. मात्र, आम्ही अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करत असून सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते अजित पवार यांच्या समवेत आहेत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. (Sharad Pawar our God; But we are with Ajitdada: Umesh Patil)
यावेळी त्यांच्यासमवेत माजी शहराध्यक्ष संतोष पवार, पक्षाचे युवा अध्यक्ष जुबेर बागवान, मोहोळचे मानाजी माने आदी उपस्थित होते. मात्र, जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्यासह शहरातील राष्ट्रवादीचे सर्व मात्री नगरसेवक या वेळी गैरहजर होते.
उमेश पाटील यांनी सांगितले की, देशाच्या व राज्याच्या हितासाठी भाजपसमवेत जाण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घेतला आहे. देशात वेगळे सरकार व राज्यात वेगळ्या विचाराचे सरकार असे असल्यास राज्याच्या विकासात बाधा येते. देशात सध्या नरेंद्र मोदी यांच्यासमोर संपूर्ण देशात चालणारा एकही चेहरा नाही. देशाचा कारभार सतरा डोक्यांच्या आणि सतरा विचारांच्या हातात जाण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांच्यासारख्या एकमुखी नेतृत्वात राहणे आवश्यक आहे.
सध्या केंद्रातील विरोधी पक्षातील विविध पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. यामुळे देशहित व महाराष्ट्राचा विकास लक्षात घेऊन सर्व कार्यकर्ते अजित पवार यांच्यासमवेत आहेत, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेनंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला व मिठाई वाटप करण्यात आली.
लवकरच संपूर्ण राष्ट्रवादी अजित पवारांसोबत
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असे म्हणण्याला त्यांनी इन्कार करत राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचाच आहे. तेच याचे ‘फाउंडर’ आहेत. पाण्यात कितीही काठी मारली तरी फक्त तरंग उठतात. मात्र, पाणी वेगळे होत नाही. त्याप्रमाणे राष्ट्रवादी एकच आहे. लवकरच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह सर्वजण अजित पवार यांच्यासमवेत येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अजित पवार उत्तम प्रशासक
लोकांची कामे होणे महत्त्वाचे आहे. उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड झाल्याने त्यांसारखा उत्तम प्रशासक राज्याला मिळाला आहे. राज्याच्या विकासात यामुळे भरच पडणार आहे. सर्व कार्यकर्ते अजित पवार यांच्या विचारावर विश्वास ठेवणारे आहेत.
उमेश पाटील म्हणाले ....
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक नेते ठरवतील
लवकरच काँग्रेसचे काही आमदार अजित पवार यांच्यासमवेत येतील
शरद पवार हे आमचे दैवत त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करणार नाही
शरद पवार यांच्याअंगी पंतप्रधानापदाची पात्रता मात्र पद भाग्यात नव्हते
राज्याचे मंत्रीमंडळ अपुरे होते आता मिळाले अनुभवी मंत्री
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.