Praniti Shinde-Pranita Bhalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur Politic's : लोकसभेतील मदतीची प्रणिती शिंदेंकडून परतफेड; पंढरपूर नगरपालिका निवडणुकीतून माघार घेत प्रणिता भालकेंना पाठिंबा

Nagar Palika Election 2025 : पंढरपूर नगराध्यक्षपदासाठी प्रणिता भालके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेत त्यांना समर्थन दिल्याने भाजपसमोर मोठे राजकीय आव्हान निर्माण झाले आहे.

Vijaykumar Dudhale
  1. प्रणिता भालके यांनी पंढरपूर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेत त्यांना अधिकृत पाठिंबा दिला आहे.

  2. भगीरथ भालके यांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची परतफेड म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या पत्नीला पाठिंबा जाहीर केल्याचे मानले जात आहे.

  3. काँग्रेसच्या या निर्णयामुळे आता भाजप कोणाला उमेदवार करते याकडे संपूर्ण पंढरपूरचे लक्ष लागले आहे.

Pandharpur, 16 November : भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर नगरपरिषदेसाठी आज (ता. 16 नोव्हेंबर) भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेस पक्षाने पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीतून माघार घेत प्रणिता भालके यांना पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी केलेल्या मदतीची खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून परतफेड करत पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्या बैठकीतील चर्चेनंतर खासदार शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. आता भाजपकडून कोण रिंगणात उतरणार, याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भगीरथ भालके (Bhagirath Bhalkae) यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या वेळीही प्रणिती शिंदे यांनी दिल्लीत जाऊन पंढरपूर मंगळवेढा का मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडवून आणला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत यांना उमदेवारी देण्यात आली होती, त्यामुळे भालके यांचा विधानसभेला निसटता पराभव झाला होता.

तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी प्रणिती शिंदे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता, त्यामुळे प्रणिती शिंदे यांनी भालके यांच्या पत्नीसाठी काँग्रेस पक्षाने माघार घेऊन पाठिंबा दिला आहे. तत्पूर्वी प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची रविवारी (ता.१६ नोव्हेंबर) बैठक घेतली. पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक काॅंग्रेस पक्ष लढणार नाही. काँग्रेस पक्षाने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे आणि विधानसभेला भगीरथ भालके यांना पंढरपूर विधानसभा मतदार संघातून चांगली मते मिळाली होती. काँग्रेसचे चिन्ह त्यावेळी घरोघरी पोचले होते.पंढरपूर शहरातही काॅंग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. मुस्लिम समाजात आजही काॅंग्रेसविषयी प्रेम आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची परतफेड करण्यासाठी प्रणिती शिंदेंनी प्रणिता भालकेंना पाठिंबा जाहीर केला आहे.

बैठकीला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बजरंग बागल, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अदित्य फत्तेपूरकर, तालुकाध्यक्ष संदीप पाटील, माजी शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, राजू उराडे, राहूल पाटील, समीर कोळी,नागेश गंगेकर,अॅड. रणजीत पाटील, शिवाजी धोत्रे, चेतन नरोटे, संदीप शिंदे, किरण घाडगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

1. पंढरपूर नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसने कोणाला पाठिंबा दिला आहे?
काँग्रेसने प्रणिता भालके यांना अधिकृत पाठिंबा दिला आहे.

2. काँग्रेसने निवडणूक का लढवली नाही?
भगीरथ भालके यांनी लोकसभेला केलेल्या मदतीची परतफेड म्हणून काँग्रेसने माघार घेतली.

3. प्रणिता भालके कोणत्या आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत?
त्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत.

4. पुढील राजकीय उत्सुकता कोणत्या मुद्द्यावर केंद्रित आहे?
भाजप पंढरपूरमध्ये कोणाला उमेदवार करते यावर सर्वांचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT