Congress  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Congress : सोलापूरच्या शहराध्यक्षांनी पाठवलेल्या प्रतिनिधीला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत 'नो एन्ट्री'; गेटवरूनच माघारी परतावे लागले

Congress State President Meeting : कॉँग्रेसचे राज्यभरातील शहर आणि जिल्हाध्यक्षांची हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी (ता. 24 फेब्रुवारी) मुंबईत बैठक बोलावली होती. त्या बैठकीला सोलापूरचे कोणीही उपस्थित नव्हते.

सरकारनांमा ब्यूरो

प्रभूलिंग वारशेट्टी

Solapur, 24 February : विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खालेल्या काँग्रेसने महाराष्ट्रात पक्षसंघटनेची पुनर्बांधणी सुरू केली आहे. त्यातूनच प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हर्षवर्धन सपकाळ या नेत्याच्या खांद्यावर देण्यात आली आहे. हायकमांडने सोपवलेल्या जबाबदारीवर खरे उतरण्यासाठी सपकाळ हे कामाला लागले आहेत. संघटना सक्षम करण्यासाठी सपकाळ यांनी मुंबईत शहर आणि जिल्हाध्यक्षांची बैठक आयोजित केली होती. सोलापूरचे जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे, त्यामुळे त्या बैठकीला सोलापूरच्या शहराध्यक्षांनी आपल्या प्रतिनिधीला पाठवले होते. मात्र, त्या प्रतिनिधीला गेटवरच अडविण्यात आले, त्यामुळे त्यांना गेटवरूनच माघारी परतावे लागले.

कॉँग्रेसचे राज्यभरातील शहर आणि जिल्हाध्यक्षांची हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी सोमवारी (ता. 24 फेब्रुवारी) मुंबईत बैठक बोलावली होती. त्या बैठकीला सोलापूरचे कोणीही उपस्थित नव्हते. सोलापूरमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचे कारण समजून घेतले असते. हे प्रतिनिधी पाठविण्याचा प्रकार पुढे आला आहे.

सोलापुरातून शहराध्यक्ष चेतन नरोटे (Chetan Narote) हे कौटुंबीक कारणांमुळे आजच्या मुंबईतील बैठकीला जाऊ शकले नाहीत. सोलापूरचे जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे, त्यामुळे कार्याध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार हे प्रदेशच्या बैठकीला जातील, असे मानले जात होते. मात्र, तेही बैठकीला गेले नव्हते. त्यामुळे काँग्रेसच्या वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात होते.

सोलापूरचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपला प्रतिनिधी म्हणून एका पदाधिकाऱ्याला प्रदेशाच्या बैठकीसाठी बोलावले होते. त्या पदाधिकाऱ्याला गेटवरच अडविण्यात आले, त्यामुळे त्यांना गेटवरून माघारी धाडण्यात आले, त्यामुळे सोलापूरचा एकही प्रतिनिधी प्रेदशाध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित नव्हता, त्याची चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसची झालेला नामुष्कीजनक पराभव पाहता ही बैठक महत्वाची होती. मात्र, त्याच बैठकीला सोलापूर जिल्ह्यातून कोणीही गेले नाही, त्यामुळे संघटना वाढीसाठी सोलापुरातील पदाधिकारी किती गंभीर आहेत, याचे दर्शन यानिमित्ताने झाले आहे.

कौटुंबीक कारणामुळे बैठकीला गेलो नाही : चेतन नरोटे

कौटुंबीक कार्यक्रमामुळे मी प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला जाऊ शकलो नाही. तसे मी पत्राद्वारे प्रदेशाध्यक्षांना कळविले होते. यापूर्वीच्या बैठकांना मी उपस्थित होतो. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काम करणाऱ्यांना पदे मिळतील, संघटना वाढविण्याला प्राधान्य द्यावे अशी सूचना केली होती, असे शहराध्यक्ष चेतन नरेाटे यांनी सांगितले.

Edited by vijay dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT