Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ कोण? बाबासाठी लेकीचे भावूक पत्र, तिला दिलेला कानमंत्रही सांगितला

Gargi Sapkal Emotional Letter For Harshvardhan Sapkal : सोशल मीडियामधून कोण हर्षवर्धन सपकाळ अशी विचारणा केली जात होती. त्यांच्या कामाविषयी देखील विचारणा होत होती. त्याविषयी गार्गी यांना आपल्या पत्रात सांगितले आहे.
Gargi Sapkal  Harshvardhan Sapkal Rahul Gandhi
Gargi Sapkal Harshvardhan Sapkal Rahul Gandhi sarkarnama
Published on
Updated on

Gargi Sapkal : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. सपकाळ यांचे नाव जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियामधून कोण हर्षवर्धन सपकाळ अशी विचारणा केली जाऊ लागली. त्यांच्या कामाविषयी देखील विचारणा होत होती. तर, सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला संधी दिल्याने त्यांचे अभिनंदन देखील करण्यात येत होते. हर्षवर्धन सपकाळ याच्या कन्या गार्गी यांनी आपल्या वडिलांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भावना व्यक्त केल्या आहेत.

गार्गी यांनी फेसबूक पोस्ट करत आपले वडील हर्षवर्धन सपकाळ यांनी शुभेच्छा देत त्यांच्यासाठी एक पत्रच लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गर्गी यांनी पत्रात म्हटले आहे की, न समाज माध्यमं, वर्तमानपत्रे आणि बातम्यांमध्ये हर्षवर्धन सपकाळ कोण? या चर्चेला उधाण आलेलं आहे. अनेकांनी तुमच्या जिवन प्रवासाचा आणि कार्याचा अत्यंत सखोलपणे आढावा घेतला आहे. काहींनी नियुक्तीबाबत टीका सुद्धा केल्या. पण एक मुलगी म्हणून या नियुक्तीबाबत मला खूप अभिमान वाटतो.

तुम्ही 'त्या' चौकटीत कधी बसला नाही

गार्गी यांनी आपल्या बाबांना पत्रात उद्देशून म्हटले आहे की, खरंतर तुमचा प्रवास कधीच सरळ-सुटसुटीत नव्हता. तो संघर्षांनी भरलेला, चढ-उतारांचा आणि धैर्याचाच होता. लोकांच्या मनात नेत्यांबाबत एक ठराविक चित्र तयार झालेलं आहे. ‘माझे बाबा राजकारणात आहेत’ असा विचार करताना किंवा तुमच्याबद्दल इतरांना वर्णन करत असताना, तुम्ही त्या चौकटीत कधी बसलात नाही हेच जाणवलं. महात्मा गांधी, विनोबा आणि तुकडोजी महाराजांनी सांगितलेल्या जिवन मूल्यांचे आचरण करत साधी राहणी आणि उच्च विचार अशीच तुमच्या जीवनाची वाटचाल राहिलेली आहे.

'त्या' कानमंत्राची आठवण

'शेतकरी, उपेक्षित, आणि आदिवासी समाजासाठी तुम्ही नेहमी सक्षमपणे आणि कुठलाही अहमभाव न ठेवता काम करत आहात. काम करताना मी कायमच सांगायचे की, ‘बाबा, इतकं काम करता पण त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर कां टाकत नाही?’ तेव्हा तुम्ही दिलेले उत्तर महत्वाचे वाटते. आपण मनापासून केलेल्या कामाचा कधीही गाजावाजा करायचा नसतो. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपण काम करत राहायचे.', या कानमंत्राची आठवण गार्गी यांनी आपल्या पत्रातून सांगितली आहे.

बाबा माझे हिरो...

बाबा, तुम्ही दाखवलंत की प्रामाणिकपणे काम केल तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं, जगात कुठेही पोहोचता येतं. तुम्ही माझे हिरो आहात आणि कायम राहाल. आज तुमच्या संघर्षाच्या, सचोटीच्या आणि तत्वनिष्ठेच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याबद्दल बोलतोय. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं! हे पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध केलंत. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी तुम्ही समर्थपणे पार पाडाल, यात शंका नाही, असे देखील गार्गी यांनी म्हटले आहे.

Gargi Sapkal  Harshvardhan Sapkal Rahul Gandhi
Pralhad Joshi on Farmers Agitation : केंद्र सरकार अन् शेतकऱ्यांमधील बैठकीबाबत केंद्रीयमंत्री जोशींनी दिली महत्त्वाची माहिती!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com