Eknath Shinde-Priyanka Gupta Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Priyanka Gupta : एकनाथ शिंदेंवर काँग्रेसचा पलटवार; ‘मुलींच्या सुरक्षेसाठी काँग्रेस ते राजकारण करेल’

Badlapur Sexual Assault Case : कोलकत्ता, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश किंवा इतर कुठेही महिलेवर अन्याय झाल्यास काँग्रेस गप्प बसणार नाही. त्याचा आम्ही विरोध करणारच.

विश्वभूषण लिमये

Solapur, 23 August : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर करण्यात आलेल्या आंदोलनात काही जणांनी राजकारण केले, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केला होता. त्यांच्या या आरोपाचा काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका गुप्ता यांनी समाचार घेतला आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी जर राजकारण केल्यास चुकीचे काय? मुलींच्या सुरक्षेसाठी असे राजकारण करावे लागत असेल तर काँग्रेस तसे राजकारण करेल, असे विधानही गुप्ता यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय प्रवक्त्या प्रियांका गुप्ता (Priyanka Gupta) आज सोलापूरच्या दौऱ्यावर (Solapur Tour) आल्या आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानावर टीका करताना काँग्रेस पक्ष असे राजकारण करेल, असे आव्हान दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का? बदलापूर घटनेतील पीडित मुलींच्या कुटुंबीयांना गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात 12 तास बसवून घेतले, त्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माफी मागणार आहेत का? असा सवालही प्रियांका गुप्ता यांनी उपस्थित केला आहे.

प्रियांका गुप्ता म्हणाल्या, बदलापूर अत्याचार घटनेनंतर ज्या लोकांनी आंदोलन केले, त्यातील 70 ते 72 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मला वाटते की शाळा प्रशासनाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण त्या शाळेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) लोक सहभागी आहेत.

त्या घटनेनंतर एका महिला पत्रकाराला शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी वाईट पद्धतीने प्रश्न विचारतात. त्या शिंदे गटाच्या नेत्यावर शिवसेना पक्ष कारवाई करणार आहे का? बदलापूर घटनेनंतर लोक आंदोलन करत होते आणि एकनाथ शिंदे हे सुटीवर होते. महायुती सरकार महिला सुरक्षेसाठी पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोपही गुप्ता यांनी केला.

प्रियांका गुप्ता म्हणाल्या, कोलकत्ता, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश किंवा इतर कुठेही महिलेवर अन्याय झाल्यास काँग्रेस गप्प बसणार नाही. त्याचा आम्ही विरोध करणारच. महिलांवर अत्याचार झाला, तर काँग्रेस गप्प बसणार नाही. मग, ममता बॅनर्जी असो की एकनाथ शिंदे असो, आम्ही गप्प बसणार नाही.

ब्रिजभूषण, चिन्मयानंद, हे युपीतून आहेत, मात्र त्यांच्या घरावर बुलडोजर चालला का? कारण भाजपचा बुलडोजर सिलेक्टिव्ह आहे, असा आरोपही काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका गुप्ता यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT