CM Eknath Shinde, Shashikant Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shashikant Shinde : विधेयकाचे श्रेय मुख्यमंत्र्यांचे की सरकारचे? शशिकांत शिंदेंनी डिवचलं...

Maratha Reservation : मराठा आरक्षण देण्याचा निर्णय योग्य कसा, हे समाजाला आणि जनतेला सांगण्याची जबाबदारी.

Umesh Bambare-Patil

Satara News : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य कसा, हे मराठा समाजाला आणि जनतेला सांगण्याची जबाबदारी सरकारची आहे. यावर समाजाचे मत येण्यापूर्वीच श्रेयवादात जल्लोष करण्यात आला. मग हे श्रेय मुख्यमंत्र्यांचे की सरकारचे हे जनतेला कळायला हवे, असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षण विधेयकावर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, हा ठराव मंजूर झाल्यानंतर सरकारने जल्लोष केला. एखादा ठराव मंजूर झाल्यानंतर जल्लोष होणे हे आजपर्यंत कधी घडले नव्हते. मुळात या विधेयकावर विधिमंडळात चर्चाच झाली नाही. 2014 आणि 2018 या वर्षांत विधिमंडळात अशा प्रकारचा ठराव मंजूर झाला आहे,मग आजच्या ठरावात वेगळे काय आहे, याची माहिती सरकारने मराठा समाजाला द्यावी लागेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे यांनी जे काही उपोषण किंवा आंदोलन सुरू केलं आहे, यावर सरकारची भूमिका काय आहे. हेसुद्धा सरकारला मांडावे लागेल. प्रस्तावावर चर्चा करून याबाबत योग्य ते बदल करता आले असते. मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे आणि हे न्यायालयापासून सर्व पातळ्यांवर टिकले पाहिजे हे महत्त्वाचं आहे.

या आरक्षणाबाबत सरकारला मराठा समाजाला विश्वासात घ्यावे लागेल आणि त्यांना सर्व बाबी सांगाव्या लागतील. जर हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही, तर सरकारवरचा समाजाचा विश्वास उडेल आणि पुन्हा राज्यात समाज आणि सरकार असा संघर्ष उभा राहील, असे आमदार शिंदे यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT