Yashraj Desai, Sunil Katkar and Raje Group supporter
Yashraj Desai, Sunil Katkar and Raje Group supporter sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : पेंटिंगच्या वादावर पडदा; राजघराणे, देसाईंच्या घराण्याचे सलोख्याचे संबंध...

Umesh Bambare-Patil

Udayanraje News : खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांच्या भित्ती छायाचित्र रेखाटनाचा कोणताही वाद झालेला नाही. रेखांकन करणाऱ्याला पोलिसांनी गैरसमजुतीतून हटकले होते. मात्र, राजघराणे व पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांच्या घराण्याचे अनेक पिढयाचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा आता फार उहापोह होऊ नये, असे स्पष्टीकरण खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने माजी शिक्षण सभापती सुनील काटकर Sunil Katkar यांनी दिले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांचे पोवई नाक्यावरील उदयनराजे यांच्या इमारतीच्या भिंतीवर राजे समर्थकांना चित्र रेखाटायचे होते. पोवई नाक्यावरील ही इमारत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाला अगदीच खेटून आहे. चित्र काढायच्या प्रक्रियेला शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज यांनी हरकत घेतली होती. चित्र काढणाऱ्या कारागिराला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे राजे समर्थकांच्या नाराजीतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावर उदयनराजे समर्थक सुनील काटकर, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पंकज चव्हाण यांची मंत्री देसाई यांच्यासमवेत बैठक झाली. सुनील काटकर यांनी सर्व वस्तुस्थिती देसाई यांच्या कानावर घालून सर्व बाबी या पूर्वपरवानगीने असल्याचे सांगितले. छायाचित्र रेखाटन हा प्रकारच मला माहित नव्हता. खासदार उदयनराजे भोसले हे आमचे जवळचे मित्र व पक्षातील सहकारी आहेत. त्यांचे रेखाचित्र चितारले जाणार असेल तर मला आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी माध्यमांना दिली.

रेखाचित्र प्रकरणावर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या दालनात ही बैठक झाली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, संग्राम बर्गे, मनोज शेंडे ,प्रीतम कळसकर, प्रशांत अहिरराव ,भाऊ चौगुले ,गणेश जाधव संदीप शिंदे, माजी नगराध्यक्ष नाशिक शेख राहुल गायकवाड रोहित लाड, कल्याण राक्षे सौरभ सुपेकर सागर साळुंखे विजय बडेकर पंकज चव्हाण सुहास राजेश शिर्के अनिकेत तपासे इ यावेळी उपस्थित होते .

या बैठकीत सुध्दा रेखाचित्र प्रकरणाला पूर्वपरवानगी घेण्यात आली होती . केवळ गैरसमजुतीतून पोलिसांनी कारागीराला हटकल्याचे कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले . या सर्व घडामोडींवर उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने सुनील काटकर यांनी भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले या खासदार उदयनराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराण्यांचे पूर्वापार संबंधआहे.

रेखांकन तणाव प्रकरणाची जी वृत्तांकने समाज माध्यमांवर प्रसारीत झाली त्यामध्ये तथ्य नाही . त्यामुळे कोणीही उदयनराजे भोसले व शंभूराज देसाई यांच्यात वितुष्ट असल्याचे राजकीय गैरसमज करू नयेत . या प्रकरणाचा साताऱ्यात कोणताही तणाव नाही . रेखाचित्र काढणाऱ्याला कारागीराला पोलिसांनी गैरसमजातून हटकले . त्यामुळे कोणीही या प्रकरणाचा गैर अर्थ काढू नये असे आवाहन उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने सुनील काटकर यांनी केले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT