Solapur Zilla Parishad election update Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur ZP Election: 'दामाजी'च्या अध्यक्षांची तडकाफडकी मोठी घोषणा; नगरपालिकेप्रमाणेच ZP निवडणुकीच्या आखाड्यातून बाहेर,कारणही सांगितलं

Solapur district local body elections: श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तीन वर्षांपूर्वी झालेल्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व गटातील संचालक मोठ्या फरकाने विजयी झाले.

हुकुम मुलाणी

Mangalwedha News: श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीत देखील आखाड्यातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. गेले दोन दिवस मंगळवेढा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या पाटील यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तीन वर्षांपूर्वी झालेल्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व गटातील संचालक मोठ्या फरकाने विजयी झाले. तीन वर्षे कारखान्याचा कामकाज करताना कामगाराचा थकीत पगार ,भविष्य निर्वाह निधीची रक्कम व इतर थकीत देणी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या गटात लिंगायत , धनगर, मराठा व इतर समाजाचे सर्वाधिक मतदार आहेत.

ऊस उत्पादक पट्टा असल्यामुळे सहाजिकच दामाजी कारखान्याबद्दल या परिसरात मोठी विश्वासार्हता ती अध्यक्ष शिवानंद पाटील व उपाध्यक्ष तानाजी खरात यांनी टिकवून ठेवल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली या गटावर वर्चस्व प्रस्थापित करणे सहज शक्य होणार होते.

अशा परिस्थितीत तीन महिन्यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत दामाजी नगर गट ओबीसीसाठी आरक्षण झाला. त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण देखील ओबीसीसाठी आरक्षित झाले. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप विरोधात तीर्थक्षेत्र आघाडी अशी लढत झाली. त्यामुळे त्याच पद्धतीने जिल्हा परिषद निवडणूक होणार असल्याची शक्यता होती.

नगरपालिकेच्या निकालानंतर तालुक्यात मत विभागणी टाळण्यासाठी आ.अवताडे व परिचारक गटात समझोता करत दामाजी नगर जिल्हा परिषद गट व तीन पंचायत समिती गण परिचारक समर्थकांसाठी तडजोडीत देण्यात आल्याचे वृत्त धडकले त्यामुळे त्या जागेसाठी शिवानंद पाटील यांच्या नावाची चर्चा जोरात जोर धरू लागली.

मात्र, शिवानंद पाटील यांनी निवडणुकीपेक्षा 'दामाजी'कडे वर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी इतर कोणताही उपपदार्थ निर्मितीचा प्रकल्प नसल्यामुळे कार्यक्षेत्रातील उपलब्ध उसाचे गाळप वेळेत करणे, कर्मचाऱ्यांचे, वाहनधारकांची देणी वेळेत अदा करणे ही जबाबदारी महत्त्वाची असल्याने या दृष्टिकोनातून निवडणुकीतून बाजूला राहण्याचा निर्णय घेतला.

दामाजीनगर जिल्हा परिषद गटासाठी माझ्या नावावर दाखवलेले प्रेम, विश्वास आणि आपुलकी मी कधीही विसरणार नाही. कार्यकर्त्यांच्या घामाला संधी मिळावी म्हणून मी स्वेच्छेने एक पाऊल मागे घेत आहे. मात्र, तुमचा जिव्हाळा, प्रेम, विश्वास कायम राहील, यावर माझा ठाम विश्वास आहे. अफवा उठल्या, नाव चर्चेत आले; पण विश्वास अबाधित राहील.

शिवानंद पाटील, अध्यक्ष श्री. संत दामाजी साखर कारखाना.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT