Udhav Thackerays Shivsena  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Shivsena News : सरसकट दुष्काळ जाहीर करा; उद्धव ठाकरे गट शिवसेनेचा मोर्चा

Nitin Banugade Patil शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला

Umesh Bambare-Patil

Satara Shivsena News : अल्प पाऊस, घटलेले उत्पन्न व वाढलेली महागाई यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्यात व सातारा जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवसेना Shivsena उपनेते,पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, शिवसेना उपनेत्या छाया शिंदे व जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर Satara collector आला.

यावेळी जिल्हा प्रमुख हर्षल कदम, संजय भोसले, जिल्हा समन्वयक रामदास कांबळे, युवासेना जिल्हाप्रमुख माऊली पिसाळ, हणमंतराव चवरे, साहेबराव शिंदे, सुधीर राऊत, सर्व पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. नितीन बानुगडे पाटील म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातच अत्यल्प पाऊस झाला असून पिके वाया गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अपेक्षित उत्पादन नाही, वाढत्या महागाई, त्यातच परतीच्या पावसाने दडी मारली आहे.

त्यातूनही निसर्ग शेतकऱ्यांच्या मदतीला काही अंशी धावून आला. पण, सरकार मात्र, शेतकऱ्यांसाठी धावून येताना दिसत नाही. राज्यातील सरकारने केवळ ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती आहे. दररोज महाराष्ट्रातील दहा ते १२ शेतकरी आत्महत्या करत आहेत. उत्पादन घटलेले असतानाही शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल असे वाटत होते, पण सोयाबीनचे दर पडलेले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सोयाबीनला क्विंटलला अकरा हजार रुपये भाव होता. आता अपेक्षित भाव नाही.

साखर कारखाने ऊसाअभावी कमी कालावधीत चलणार आहेत. त्यामुळे साखरेचे दर वाढणार आहेत. पण त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. त्यामुळे यावर्षी ऊसाला टनाला चार हजार दर द्यावा अशी आमची मागणी आहे. केवळ चाळीस तालुक्यापुरते नव्हे सरसकट दुष्काळ जाहीर करावा. वाई, खंडाळ्यात दुष्काळ जाहीर झाला पण माण, खटाव, कोरेगाव, कराडची स्थिती गंभीर होत आहे. हे लक्षात घ्यायला हवे. Maharshatra political news

त्यामुळे राज्य सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आहे. रब्बीची पेरणी करण्यासाठी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पुरेसे पाणी नसल्याने शेतकऱ्यांना सरकारने ठोस मदत केली पाहिजे. तसेच खरिपातील उत्पादनात घट झाल्यामुळे विमा कंपनीने अग्रीम २१ दिवसात देणे बंधनकारक असताना तेही दिलेला नाही.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT