Satara Grampanchayat Election Result : साताऱ्यात महायुतीचा डंका; १०७ ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व

Mahayuti महाविकास आघाडीला फक्त २० ग्रामपंचायतींमध्ये समाधान मानावे लागले आहे. जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Devendra Fadanvis, Ajit Pawar, Eknath shinde
Devendra Fadanvis, Ajit Pawar, Eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Satara Grampanchayat Election Result : सातारा जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीने १०७ ग्रामपंचायतींत वर्चस्व राखत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील Satara politics १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये ६८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. यामध्ये महायुतीने Mahayuti सर्वाधिक ग्रामपंचायती मिळवून जिल्ह्यावर वर्चस्व सिद्ध केले आहे.

कदम यांनी म्हटले, की जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ५९, शिवसेना शिंदे गटाला २७, राष्ट्रवादी अजितदादा गट २१ अशा एकूण महायुतीला १०७ ग्रामपंचायतींत यश मिळाले आहे. महाविकास आघाडीला फक्त २० ग्रामपंचायतींत समाधान मानावे लागले आहे.

जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महायुतीच्या विजयाचा महामेरू आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही असाच पुढे जाईल. २०२४ मध्ये महाविजय साकार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. maharashtra Political News

Devendra Fadanvis, Ajit Pawar, Eknath shinde
Satara News : मराठा आरक्षणाची मागणी गांभीर्याने घ्या; माथाडी संघटना महाराष्ट्राचे अन्नधान्य बंद करेल : शशिकांत शिंदे

महायुतीला मिळालेल्या या यशाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, महेश शिंदे, डॉ. अतुल भोसले, मदन भोसले, नरेंद्र पाटील, मनोज घोरपडे, विक्रम पावसकर, सुनील काटकर, रामकृष्ण वेताळ यांनी अभिनंदन केले आहे.

Edited By : Umesh Bambare

Devendra Fadanvis, Ajit Pawar, Eknath shinde
BJP News : ऐन निवडणुकीच्या प्रचारातच घात झाला,भाजप नेत्याची निर्घृण हत्या; हल्ल्याच्या घटनेने खळबळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com