Solapur, 10 November : मागील 2019 च्या निवडणुकीतच मी दीपक साळुंखे यांना शिवसेनेची उमेदवारी देणार होतो. त्यादृष्टीने आमचं बोलणंही झालं होतं. मात्र, मध्येच धरण फोडणारा खेकडा घुसला. तो खेकडा कोण हे तुम्हाला माहिती आहे. त्यानं सांगितलं की साहेब माझं ऐका हा (शहाजी पाटील) शंभर टक्के निवडून येतोय. त्यामुळे मी दीपक साळुंखेंना विनंती केली आणि ते थांबले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही आठवण सांगोल्याच जाहीर सभेत सांगितली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगोल्याचे उमेदवार दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांच्या प्रचारानिमित्त सांगोल्यात उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच. धरण फोडणार खेकडा म्हणून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा समाचारही घेतला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच मी दीपकआबाला उमेदवारी देणार होतो. आमच्या दोघांमध्ये तसं बोलणंही झालं होतं. मात्र, मध्येच तो धरण फोडणारा खेकडा घुसला आणि कोण ते तुम्हाला माहिती आहे. त्याने सांगितलं की, साहेब माझं ऐका हा (शहाजी पाटील) शंभर टक्के निवडून येतोय. मी ठीकाय म्हटलं आणि दीपक आबांची उमेदवारी रद्द झाली.
मी दीपकआबांना विनंती केली की, मला हे हे करावं लागतंय. त्यांनी सांगितल्यावर ऐकलं. कुठेही बंडखोरी केली नाही. लांडी लबाडी केली नाही. असा सैनिक आपल्याला पाहिजे. त्यांनी आता सांगितलं की, किती वर्षे मी थांबलो आहे.
दीपक आबा तुमच्या मध्ये येणारे स्पीड ब्रेकर आम्ही सपाट केलेले आहेत. तुमच्या मध्ये येणारे एक मोठं ढेकूळ आहे, तेही आपल्याला सपाट करून टाकायचं आहे, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी शहाजी पाटलांवर निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन केले.
जनता गद्दाराचा माज उतरवेल
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एका गद्दाराला आपण उमेदवारी दिली होती, त्या गद्दाराला तुम्ही सर्वांनी विधानसभेत जाण्याची संधी दिली. त्याने फक्त त्या संधीचीच नाही, तर अख्ख्या आयुष्याचं मातेरे केलं आहे. एखाद्याा किती माज असावा? लय म्हणजे एकदमच लय. पण ज्यांनी त्याला मोठं केलं होतं, त्याला हे माहिती नव्हतं की, ही जनता त्याचा माजसुद्धा उतरवू शकते, असेही ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.