Jaykumar Gore-Deepak Salunkhe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore : दीपकआबा, ती उधारी वसूल करायलाच तुम्हाला स्टेजवर बसवलंय;जयकुमार गोरेंची तुफान टोलेबाजी

Sangola Political News : दीपकआबांसोबत एक नव्हे तर पाच-पाच लाखांच्या दोन पैजा लावल्या होत्या. सांगोल्याच्या मातीतला गडी शब्दाला जागणारा असेल, असं वाटलं होतं. मात्र, आबा मला अजून दहा लाख रुपये मिळाले नाहीत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 17 February : दीपकआबा तसा तयारीचा गडी आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत पैज लावली होती, त्याची आठवण करून देण्यासाठी त्यांना कार्यक्रमाला बसा, असं म्हटलं आहे. दीपकआबांसोबत एक नव्हे तर पाच-पाच लाखांच्या दोन पैजा लावल्या होत्या. सांगोल्याच्या मातीतला गडी शब्दाला जागणारा असेल, असं वाटलं होतं. मात्र, आबा मला अजून दहा लाख रुपये मिळाले नाहीत. ती उधारी मागण्यासाठी तुम्हाला स्टेजवर बसवलं आहे, अशी कोपरखळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार दीपक साळुंखे यांना मारली.

उजनी धरणातून सांगोला तालुक्यातील २२ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या (स्व.) बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या सुमारे ३०० कोटी रुपये खर्चाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना जयकुमार गोरेंच्या (Jaykumar Gore) भाषणाने उपस्थितांमधून हास्याचे फवारे उडत होते.

जयकुमार गोरे म्हणाले, मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दीपकआबा साळुंखे (Deepak Salunkhe ) यांनी माझ्यासोबत पैज लावली होती. एक नव्हं, तर त्यांनी दोन पैजा लावल्या होत्या. मी म्हटलं, सांगोल्याच्या मातीतला गडी शब्दाला जाणारा असेल. पण आबा अजूनही मला दहा लाख रुपये मिळालेले नाहीत.

बापू एक नव्हं, दोन पैजा आहेत, पाच पाच लाखांच्या दोन पैजा दीपकआबांनी माझ्याबरोबर लावल्या होत्या. फोनवरून सांगत होते, माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून येणार नाहीत, अशी त्यांनी पहिली पैज पाच लाख रुपयांची लावली होती. दुसरी पैज सांगोल्याच्या लीडवर लावली होती, आठवतंय का तुम्हाला. त्यामुळे उधारी मागायला तुम्हाला स्टेजवर बसवलं आहे, अशी कोपरखळी गोरे यांनी दीपक साळुंखे यांना लगावली.

सांगोला विधानसभा मतदारसंघातून दीपक साळुंखे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून, तर शहाजीबापू पाटील यांनी शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली हेाती. दोघेही एकमेकांच्या विरोधात लढले आणि पराभूत झाले. त्यावरही जयकुमार गोरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, आता दोघंही स्टेजवर आहेत आणि दोघंही घरी बसले आहेत. तुलाही नाही अन्‌ मलाही नाही आणि घाल....’

तुम्ही जो शब्द टाकाल, दे द्यायला हा जयकुमार गोरे मागे हटणार नाही

मी शेतकऱ्याचा पोरगा असून देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून काम करत आहे. सांगोल्याशी माझं फार जवळचं नातं आहे. शहाजीबापू या भागातील कामाच्या बाबतीत तुम्ही जो शब्द टाकाल, मला जे देण्यासारखं आहे, दे द्यायला हा जयकुमार गोरे कधी मागे हटणार नाही. मी भूमिका घेऊन ताकदीने काम करणार आहे. कोण काय म्हणतंय, कोण किती मोठा, त्याचा मला फरक पडत नाही. आपला विषय एकच मी पक्षाचा आणि दुसरा मी सामान्य माणसाचा, असाही इशारा जयकुमार गोरे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT