Devendra Fadanvis, Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara BJP News : देवेंद्र फडणवीस ठरविणार माढा, सातारा लोकसभेची रणनिती; दोन दिवस सातारा दौऱ्यावर...

Jaykumar Gore सातारा शासकीय विश्रामगृहात जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Umesh Bambare-Patil

Satara BJP News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या बुधवार (ता. २१ ) व गुरूवारी (ता. २२) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. भाजपच्या बुथ प्रमुखांच्या संमेलनाला मार्गदर्शन करणार असून सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाच्या कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत, अशी माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी आज दिली.

सातारा शासकीय विश्रामगृहात आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले Shivendraraje Bhosale, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, धैर्यशिल कदम, रामकृष्ण वेताळ, विक्रम पावस्कर, विकास गोसावी, राहुल शिवनामे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जयकुमार गोरे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा जिल्ह्याच्या दौऱयावर येत आहेत. दि. 21 रोजी कराडला मुक्कामी येतील. त्यानंतर दि. 22 सकाळपासून त्यांच्या जिह्याच्या दौऱयाला प्रारंभ होईल. कराडच्या टाऊन हॉल येथे जिह्याच्या सर्वच विधानसभा बुथ अध्यक्षांचे, बुथ प्रमुखांचे संमेलन होणार आहे. कराड दक्षिणमधील लाभार्थ्यांचा भव्य मेळावा होणार असून या मेळाव्याला जिल्हयातील 10 हजार लाभार्थी उपस्थित राहणार आहेत.

त्या मेळाव्यात श्री. फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत. सातारा जिल्ह्याच्या प्रशासकीय कामाच्या बाबतीत आढावा बैठक होईल. त्या बैठकीत जिह्यातील विविध विषयांचा आढावा घेतील. मेडिकल कॉलेजच्या कामाचा, एमआयडीसी आदी मुद्यावर ते माहिती घेतील. त्यानंतर भाजपाच्या सातारा लोकसभा मतदार संघाच्या कोअर कमिटीची बैठक होईल. बैठकीनंतर

फलटण तालुक्यातील बरड येथे माऊलींची पालखी आहे. तेथेते पालखीचे दर्शन घेतील. त्यानंतर माण तालुक्यातील दहिवडी येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. ही योजना जिहे- कटापूर उपसा सिंचन योजनेतून 32 गावांसाठी पाणी देणारी आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता तेथेच जाहीर सभा होईल. त्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहतील. सायंकाळी माढा लोकसभा मतदारसंघाच्या कोअर कमिटीची बैठक होईल, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT