Shahajibapu Patil-Dhairyasheel Mohite Patil -Ranjitsinh Naik Nimbalkar-Babasaheb Deshmukh 
पश्चिम महाराष्ट्र

Madha Politic's : अकलूजचे धैर्यशील अन्‌ फलटणचे रणजितसिंह यांना एकमेकांशेजारी बसविण्यासाठी शहाजीबापूंची धडपड!

Balasaheb Thackeray Upsa Irrigation Scheme Bhumi Poojan : खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना खुर्ची नसल्याचे पाहून विखे पाटील हेच जागेवरून उठून उभे राहिले, त्यांनी मोहिते पाटील यांच्यासाठी खुर्ची आणण्याचे सांगितले.

Vijaykumar Dudhale

Solapur, 17 February : (स्व.) बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचे आज (ता. 17 फेब्रुवारी) राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सांगोला तालुक्यातील महूद येथे मोठ्या थाटात भूमिपूजन करण्यात आले. हा कार्यक्रम राजकीय कोट्या, टोलेबाजी आणि एकमेकांना चिमटे काढण्यामुळे चांगलाच रंगला. याशिवाय थेट व्यासपीठावर घडामोडीही घडल्या, त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. याच कार्यक्रमात एकमेकांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवलेल्या धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांना एकमेकांच्या शेजारी बसविण्यात आले होते, त्यासाठी शहाजीबापूंनी पुढाकार घेतला होता.

उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी विखे पाटील यांच्यासह सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil), सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत आदी उपस्थित होते.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमस्थळी बसण्यासाठी अगोदर पाट मांडण्यात आले होते. मात्र, त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांना बसता येईना, त्यामुळे ऐनवेळी खुर्ची मागवण्यात आल्या. सुरवातीला मागवण्यात आलेल्या खुर्च्यांवर राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar ), बाबासाहेब देशमुख बसले होते. मात्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि दीपक साळुंखे यांना बसायला खर्च्या नव्हत्या, त्यामुळे ते दोघे उभेच होते. त्यामुळे भूमिपूजनस्थळी एकच धांदल उडाली. पाठीमागच्या खुर्च्या पुढे घेण्याची एकच धावपळ सुरू झाली.

बाबासाहेब देशमुख, रणजितसिंह नाईक निंबाळकर, शहाजीबापू पाटील, जयकुमार गोरे आणि विखे पाटील या क्रमाने व्यासपीठावर नेतेमंडळी बसले होते. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना खुर्ची नसल्याचे पाहून विखे पाटील हेच जागेवरून उठून उभे राहिले, त्यांनी मोहिते पाटील यांच्यासाठी खुर्ची आणण्याचे सांगितले. कार्यकर्ते खुर्ची आणत होते, त्याचवेळी माजी खासदार हे निंबाळकर हे बाबासाहेब देशमुखांच्या शेजारी खुर्ची ठेवण्यास सांगत होते.

दुसरीकडे, शहाजीबापू मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी माजी रणजितसिंह निंबाळकर यांच्याशेजारी खुर्ची लावण्यास सांगत होते. त्याचवेळी विखे पाटील यांनीही शहाजीबापू आणि निंबाळकरांच्या मध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी खुर्ची लावण्यास सांगत होते.अखेर कार्यकर्त्यांनी निंबाळकरांच्या शेजारीच मोहिते पाटील यांची खुर्ची लावली, त्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.

माढा लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यात निवडणुकीवेळी दोघांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे निंबाळकर आणि मोहिते पाटील हे प्रथमच या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते आणि त्या दोघांना शहाजीबापू आणि विखे पाटील यांनी एकमेकांच्या शेजारी बसवले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT