Shivsena UBT Leader : ठाकरेंच्या ‘त्या’ नेत्याच्या भाजप प्रवेशाबाबत बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले ‘त्यांच्या राजकीय आयुष्यावर...’

Maharashtra Political News : ‘आम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही, भाजपची ही पद्धती नाही,’ असे सांगितले आहे. भाजपने विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. या संकल्पनेला साथ देण्यासाठी अनेक लोक पक्षात प्रवेश करतात.
Bhaskar Jadhav-Chandrashekhar Bawankule
Bhaskar Jadhav-Chandrashekhar Bawankule Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 17 February : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र, त्यांच्या पक्ष प्रवेशावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘आमच्याशी अद्याप कोणीही संपर्क केलेला नाही,’ असे स्पष्ट केले आहे. जाधव असो वा पाटील दोघांच्याही राजकीय आयुष्यावर प्रश्नचिन्ह लावू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची चर्चासुद्धा झाली आहे. ते नाराज नाहीत, असेही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. भास्कर जाधव शिवसेनेचे गटनेते आहेत. त्यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते व्हायची इच्छा आहे. मात्र, उद्धव सेनेच्या वतीने त्यांना डावलून आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेते केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जाधव नाराज असल्याचे सांगण्यात येते.

कोकणातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे ते एकमेव आमदार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जाधव भाजपत जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीमध्ये सहभागी होत आहेत. ‘ऑपरेशन टायगरची’सुद्धा राज्यात चर्चा रंगली आहे. कोकणातील शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Bhaskar Jadhav-Chandrashekhar Bawankule
Angar Upper Tehsil : माजी आमदार राजन पाटील यांना दणका; अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याचा हायकोर्टाचा आदेश

या सर्व घडामोडींवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘आम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही, भाजपची ही पद्धती नाही,’ असे सांगितले आहे. भाजपने विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. या संकल्पनेला साथ देण्यासाठी अनेक लोक पक्षात प्रवेश करतात. आमच्या पक्षात या असे आम्ही कधीही कोणाला म्हणत नाही. ज्यांना भाजपमध्ये यायची इच्छा आहे त्यांचे आम्ही स्वागत करतो.

Bhaskar Jadhav-Chandrashekhar Bawankule
Dhas-Munde Meeting : बावनकुळेंनी सुरेश धसांना पुन्हा उघडे पाडले; म्हणाले, ‘धनंजय मुंडेंसोबत 28 दिवसांपूर्वीच भेट झालीय...’

आमचे सरकार कुठली योजना बंद करणार नाही. विकसित महाराष्ट्रासोबत या, आमच्या सोबत काम करा आणि महाराष्ट्राला पुढे न्या, या भूमिकेतून आम्ही काम करत आहोत. त्यासाठी एक कोटी सोळा लाख लोकांनी भाजपची प्राथमिक सदस्यत्व घेतले आहे. मोठा पक्ष म्हणून आम्ही काम करीत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com