DhananjayMahadik-RiturajPatil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Mahadik : 'त्या' गावात चांदीचे रस्ते अन्‌ सोन्याची कौलं असतील असं वाटलं? महाडिकांनी वर्मावर बोट ठेवले

Kolhapur South Assembly Constituency : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मागील वेळी गोऱ्या गोमट्या आमदाराला निवडून दिले. मात्र, हा आमदार पाच वर्षे दिसलाच नाही. गावागांवात कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याचे बॅनर लावले आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur, 24 October : राज्यात चर्चेचा विषय ठरणारी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाडिक आणि पाटील गटातील निवडणुकीसाठी दोन्ही बाजूचे उमेदवार सज्ज झाले आहेत. एकमेकांवर टीकाटिपण्णी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक गाजवण्यावर भर दिला आहे. भाजपकडून माजी आमदार अमर महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज (ता. 24 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल केला.

काँग्रेसकडून घोषणा झाली नसली तरी आमदार ऋतुराज पाटील यांनी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्या मेळाव्यात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या खास शैलीत विद्यमान आमदार ऋतुराज पाटलांवर निशाणा साधला आहे.

भाजपच्या मेळाव्यात धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) म्हणाले, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मागील वेळी गोऱ्या गोमट्या आमदाराला निवडून दिले. मात्र, हा आमदार पाच वर्षे दिसलाच नाही. गावागांवात कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याचे बॅनर लावले आहेत.

दोन हजार लोकसंख्या वस्ती असलेल्या गावात 19 कोटी दिले असल्याचे बॅनर लावले, त्यामुळे मला त्यांच्या कामावर शंका आली. मी मुद्दाम चक्कर मारली. मला वाटलं गावात, चांदीचे रस्ते आणि सोन्याची कवले असतील, असा टोला महाडिक यांनी लगावला.

महायुतीचे (Mahayuti) दहा उमेदवार निवडून येणार आहेत. सर्वात जास्त मतांनी अमल महाडिक निवडून येणार आहेत. आता हे जाहीरपणे सांगण्याची कुठल्या ज्योतिषाची गरज नसल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितलं.

अमल महाडिक यांनी 2014 ते 19 या काळात कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये शाश्वत विकास केला होता. मात्र, मागील पाच वर्षांत लोकांनी छळ आणि कपटच अनुभवला आहे. माजी पालकमंत्री यांचा विकासाशी काही संबंध नाही. छळ आणि कपट करण्यामध्ये ते माहीर आहेत, असा आरोप धनंजय महाडिक यांनी केला.

आज महायुतीचा कौल आहे, अमल महाडिक यांनी आमदार नसताना निधी खेचून आणला आहे. विरोधकांचा खोटा प्रचार सुरू आहे. काँग्रेसने सत्तर वर्ष फसवले. महायुतीने महिलांना सन्मान दिला, आता जागरूक राहा. आम्हाला खात्री आहे, तुम्ही ऋतुराज पाटलांना पाडणार आहात, अशी खात्री अमल महाडिक यांच्याबाबत व्यक्त केली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT