Solapur, 30 January : ईव्हीएमविरोधातील चळवळ राज ठाकरे, मनोज झा, राघव चढ्ढा, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अरविंद कअेजरीवाल यांच्या सोबतीने आम्ही लढणार आहे. आम्ही काशीविश्वेश्वरापासून अयोध्यापर्यंत आम्ही सगळे साखळी आंदोलन उभे करू. निवडणुकीत पारदर्शकता आणल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही. राज्य सरकारने आमचा काय छळ करायचा ते करू द्या आम्ही शांत राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, असे भाष्य केले. मनसेच्या राजू पाटलांना मिळालेली मते, बाळासाहेब थोरातांचा पराभव, अजित पवारांच्या पक्षाला मिळालेले यश आणि शरद पवारांच्या पक्षाला मिळालेल्या दहा जागा यांवर जोरदार युक्तिवाद केला. त्याच अनुषंगाने ईव्हीएमच्या मुद्यावर लढणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत केले.
आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) म्हणाले, राज ठाकरे यांचे या लढ्यानिमित्ताने स्वागत करतो. निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम फॅक्टर आहे, तो हेराफेरी करणारा आहे. विधानसभेचा निकाल अनपेक्षित आहे. विधानसभेच्या निवडणुकीला चिठ्ठी पडण्याची वेळ वेगळी हेाती. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ज्या कक्षात सीसीटीव्ही लावले आहे. त्यातील पाच कक्षाचे सीसीटीव्ही देण्याची मी मागणी केली आहे. मारकडवाडी प्रकरणात जिल्हा प्रशासनाने पोलिस का घातले? मारकडवाडी प्रकरणातील जनतेचा आक्रोश आहे, तो निवडणूक आयोगाला जाणून घेता आला नाही.
राज ठाकरे यांना मी नक्कीच पुढच्या आठवड्यात भेटणार आहे. राज ठाकरे यांना माझ्याकडचे पुरावे दाखवले, तर ते आणखीन या लढतीत ताकतीने उतरतील. ईव्हीएमबाबतच्या लढ्याचा राज ठाकरे यांना त्यांचा पक्ष उभा करण्यातही मदत होईल. अनेक लोकांचा जीव या ईव्हीएम मशीनने घेतला आहे. लोकांचा आक्रोश मांडण्यासाठी या ईव्हीएममध्ये दुरुस्त करणे गरजेचे आहे, असा दावा जानकर यांनी केला.
मारकडवाडीसंदर्भात मी राज ठाकरेंची सोमवारी किंवा मंगळवारी भेट घेणार आहे. मारकडवाडी प्रकरणासंदर्भात माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, ते मी इलेक्शन कमिशनलाही दिले आहेत. त्यांनी पंधरा दिवसांची वेळ दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उत्तम जानकर म्हणाले, आमदारकीच्या राजीनाम्याबाबत जानकर म्हणाले, मी आमदारकीचा राजीनामा दिला. कारण, मला दाखवायचं आहे की, मी किती मतांनी निवडून आलो आहे. अन्यथा मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे. बॅलेट पेपरच्या मुद्द्यावर मी आजही राजीनामा द्यायला तयार आहे. माझ्या मतदारसंघाची म्हणजे माळशिरस मतदारसंघाची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, हे मी सभापती आणि राज्य सरकारलाही आवाहन करतो.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.