Dhananjay Munde Delhi Tour : धनंजय मुंडेंचा दिल्ली दौरा कशासाठी?; अजितदादांनी दिली महत्वपूर्ण माहिती...

Ajit Pawar's Statement : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे बुधवारी दिल्लीत गेले होते, विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यावेळी दिल्लीत होते. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
Dhananjay Munde-Ajit Pawar
Dhananjay Munde-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Beed, 30 January : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणावरून राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापलेले आहे. विशेषतः अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत प्रचंड दबाव महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असताना मंत्री मुंडे यांनीही बुधवारी (ता. २९ जानेवारी) दिल्ली दौरा केला, त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून मुंडेंच्या राजीनाम्याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, बीड दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत भाष्य केले आहे.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची दिल्लीत दाेन दिवसांची महत्वाची बैठक चालेली आहे. मात्र, बातम्या काहीही चालेल्या आहेत. ह्याच्या करता गेले, त्याच्याकरता गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मला विचारून धनंजय मुंडे दिल्लीला गेले होते. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या केंद्रीय पातळीवर बैठका असतात. त्या बैठकीला राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मंत्र्याला दिल्लीत जावं लागतं.

आर्थिक विभागाच्या बैठकांना मला जावं लागतं. गृह विभागाच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस जातात. नगरविकास विभागाच्या बैठकांना एकनाथ शिंदे यांना जावं लागतं. पशुसंवर्धन आणि पर्यावरण विभागाच्या बैठकीसाठी पंकजा मुंडे यांना जावं लागतं. वास्तविक, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या बैठका दिल्लीत आजही सुरू आहेत. मात्र, त्याचा निरोप धनंजय मुंडेंना मिळाला नाही. त्यामुळे ते आज बीडला आले आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Dhananjay Munde-Ajit Pawar
Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाजप खासदाराचे मोठे भाष्य; कोल्हापूरच्या हद्दवाढीचेही दिले संकेत

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, दिल्लीतील बैठका महत्वाच्या आहेत. कारण दिल्लीतून जास्तीत जास्त पैसा आपल्या राज्याला कसा मिळेल, याची तजबीज अशा बैठकांमधून होत असते.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे काल दिल्लीत गेले होते, विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यावेळी दिल्लीत होते. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंडेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत माहिती दिली आहे.

Dhananjay Munde-Ajit Pawar
Beed Politics : बीड दौऱ्यावर येताच अजितदादांचा मोठा निर्णय, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या सुरेश धसांसह 'या' आमदाराला डीपीडीसीतून हटवलं

फडणवीस म्हणाले, मी माझ्या कामासाठी, तर धनंजय मुंडे हे त्यांच्या कामासाठी दिल्लीला आले होते, त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण सकाळी आमची भेट झाली होती. कॅबिनेट बैठकीवेळी आमची भेट झाली होती. धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटणं चोरी नाही. ते मला आणि मी त्यांंना कधीही, कोणत्याही कामासाठी भेटू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com