Dr. Shirish Valsangkar Sarkarnamna
पश्चिम महाराष्ट्र

Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकरांच्या सुनेच्या नावे प्रॉपर्टीतील 50 टक्के शेअर्स; पण चौकशीत ‘ही’ महत्वपूर्ण बाब आली समोर...

Solapur Crime News : डॉ. वळसंगकर यांनी आपल्या मृत्युपत्रात बदल केल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांच्या स्नुषा डॉ. शोनाली यांच्या नावे प्रॉपर्टीतील 50 टक्के शेअर्स असल्याचे पोलिस चौकशीत पुढे आले आहे. मात्र, डॉक्टरांच्या सूनबाई शोनाली ह्या घटस्फोट घेण्याच्या तयारीत होत्या, ही बाब तपासात समोर आलेली आहे.

Vijaykumar Dudhale, तात्या लांडगे

Solapur, 25 April : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाला आज (ता. 25 एप्रिल) आठ दिवस पूर्ण होत आहेत. मात्र, पोलिस अजूनही डॉक्टरांच्या आत्महत्येच्या ठोस कारणापर्यंत पोचू शकलेले नाहीत. डॉक्टरांच्या मृत्यूपत्राबाबत मध्यंतरी वावड्या उठल्या होत्या. पण, वळसंगकर यांच्या स्नूषा डॉ शोनाली यांच्या नावे प्रॉपर्टीतील 50 टक्के शेअर्स कायम असल्याचे पुढे आले आहे. मात्र, स्नूषा डॉ शोनाली ह्या घटस्फोट घेण्याच्या मानसिकतेत होत्या, हेही पोलिस तपासात पुढे आलेले आहे, त्यामुळे डॉक्टरांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.

विख्यात मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी 18 एप्रिल रोजी गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून त्यांचा मुलगा डॉ. अश्विन यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीनुसार वळसंगकर हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिला अटक करण्यात आली होती. तिला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश सोलापूर न्यायालयाने दिला होता.

मनीषा मुसळे-माने हिची पोलिस कोठडीची मुदत आज संपणार आहे. तिला आज पुन्हा सोलापूर (Solapur) न्यायालयात उभे करण्यात येणार आहे, त्यामुळे न्यायालय मनीषा मुसळे मानेला दिलासा देणार की पुन्हा कोठडी देणार, याची उत्सुकता आहे.

दरम्यान, डॉ. वळसंगकर यांनी आपल्या मृत्युपत्रात बदल केल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांच्या स्नुषा डॉ. शोनाली यांच्या नावे प्रॉपर्टीतील ५० टक्के शेअर्स असल्याचे पोलिस चौकशीत पुढे आले आहे, त्यामुळे मृत्यूपत्रासंदर्भात पोलिसांनी कोणतीही चौकशी केलेली नाही. मात्र, डॉक्टरांच्या सूनबाई शोनाली ह्या घटस्फोट घेण्याच्या तयारीत होत्या, ही बाब तपासात पुढे आलेली आहे.

सीडीआरची पडताळणी सुरू

डॉ. शिरीष वळसंगकर आणि मनीषा मुसळे-माने या दोघांच्या मोबाईलचे सीडीआर पोलिसांना मिळाले आहेत. यामध्ये डॉक्टरांच्या दोन, तर मुसळे-माने हिच्या एका मोबाईलचा समावेश आहे. त्या सीडीआरची पडताळणी सुरू केली आहे. आत्महत्येच्या आधी डॉक्टरांनी नेमके कोणा कोणाला कॉल केले होते, तसेच कोणाचे कॉल आले होते, याचा उलगडा होणार आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासणार

डॉ. शिरीष वळसंगकर यांचे राहते घर आणि हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजचीही पोलिस तपासणी करत आहेत. डॉ. शिरीष वळसंगकर आणि मनीषा मुसळे माने हिच्या हॉस्पिटलमधील केबिनची झाडाझडती पोलिसांनी घेतली आहे. या दोन्ही केबिनमधून पोलिसांनी महत्वाची कागदपत्रे हस्तगत केली आहेत. मात्र, आर्थिक गैरव्यवहारसंदर्भात ठोस कागदपत्रे मिळाली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. आतापर्यंतच्या तपासात काय काय पुढे आले, हे आज सुनावणीत पुढे येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT