Solapur : पंढरपूर हे जगाच्या नकाशावर 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. त्याचा विकास करताना वाराणसी, हरिद्वार, तिरुपती बालाजी आदी देवस्थानचा विचार करावा. जेणेकरुन श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक हा पंढरपूरचा विकास पाहून तृप्त व्हायला हवा असा आशावाद विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. तसेच तीर्थक्षेत्र पंढरपूर शहराचा विकास करताना स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वारकरी भाविक यांचा प्रामुख्याने विचार करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पंढरपूर(Pandharpur) कॉरिडॉर, आषाढी वारी नियोजनाचा आढावा आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आराखडा यावर सविस्तर आढावा डॉ गोऱ्हे यांनी घेतला. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कॉरिडॉरबाबत आराखडा तयार करताना प्रशासनाने लोकांना विश्वासात घ्यायला हवे. विकास कामात पारदर्शकता ठेवल्यास लोकांचा गैरसमज होणार नाही. कॉरिडॉरबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. ते दूर करणेसाठी प्रशासनाने जनतेशी संवाद साधावा अशा सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.
तीर्थक्षेत्र विठ्ठल मंदिरा(Vitthal Mandir)च्या संवर्धनासाठी शासनाने 73 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून मंदिराचे प्राचीन सौंदर्य उजळून निघेल. त्याचबरोबर मंदिराचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. संत विद्यापीठ, यमाई तलाव सुशोभीकरण, वारकऱ्यांच्या आरोग्य विषयक सुविधा, भक्त निवास आदी विषयावर प्रशासनाने अधिक लक्ष घालावे असेही डॉ. गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.
प्रतिपंढरपूर विकसित करण्यावर भर द्यावा...
कॉरिडॉरचा प्रस्ताव तयार करावा. तो करताना त्यात पारदर्शकता ठेवावी. लोकांना विश्वासात घेताना जुन्या पंढरपूरवर अधिकचा भार न टाकता चंद्रभागेच्या पैलतीरावर प्रति पंढरपूर विकसित करण्यावर भर द्यावा अशी सूचनाही गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
मंदिर विकासासाठी शासनाने मंजूर केलेल्या 73 कोटी रुपयांच्या निधीमुळे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व पंढरपूरच्या विकासाला चालना मिळणार आहे. या निधीतून मंदिराचे प्राचीन सौंदर्य उजळून निघेल. त्याचबरोबर मंदिराचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. या निधीचा सुयोग्य वापर करावा. या तरतुदीमुळे संत विद्यापीठ, वारकऱ्यांना आरोग्य विषयक सुविधा, भक्त निवास अशा प्रलंबित विषयांना गती मिळणार आहे. त्याचबरोबर शिर्डीप्रमाणे पंढरपूरला विमानतळासाठी प्रस्तावावर आवश्यक कार्यवाही करावी. त्यामुळे जगभरातील भाविक पंढरपूरशी जोडला जाईल असेही त्या म्हणाल्या.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे(Dr.Neelam Gorhe) म्हणाल्या, पंढरपूर कॉरिडोरऐवजी प्रतिपंढरपूर ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवावी. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन विकास आराखडा अंतिम करावा. कोणावरही अन्याय होऊ न देता, सर्व घटकांना समाविष्ट करून घ्यावे. नागरिकांनाही सहकार्याची भूमिका घ्यावी असेही त्यांनी सूचित केले.
जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे यांनी सादरीकरण केले. यामध्ये तीर्थ क्षेत्र विकास आराखडा निर्मिती कार्यवाही, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात करावयाच्या पायाभूत सुविधा, पायाभूत विकास कामे, पालखी तळ भूसंपादन, झालेल्या बैठका, अभ्यास पथकाच्या सूचना, स्थानिक संघर्ष समितीचा आराखडा, आवश्यक निधी, सूचना व हरकती आदिबाबत सविस्तर माहिती दिली. त्यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.
या बैठकीला सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, पंढरपूरचे मुख्याधिकारी अरविंद माळी, देवस्थान समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औंसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, पंढरपूर विकासाचे अभ्यासक सुनील उंबरे आदी उपस्थित होते.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.