Ashadhi Ekadashi News : भाजप - शिवसेना युतीत पुन्हा वादाची ठिणगी ? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या 'महापूजे'ला विरोध

BJP Vs Shivsena : '' ...नंतरच मुख्यमंत्र्यांनी आषाढीच्या शासकीय महापूजेला यावे!''
Ashadhi Ekadashi News
Ashadhi Ekadashi NewsSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur : काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन भाजपा शिवसेना युतीत वादाची ठिणगी पडली होती. यानंतर आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण ढवळून निघाल्यानंतर युतीतील वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत वादावर पडदा टाकला होता. मात्र, आता पुन्हा एकदा पंढरपूर येथील आषाढी एकादशीला होणाऱ्या महापूजेवरुन भाजप आणि शिवसेनेत वाद पेटण्याची शक्यता आहे.

आषाढी यात्रे(Ashadhi Ekadashi)च्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील नमामी चंद्रभागा योजनेवरून सोलापूर जिल्हा भाजप आध्यत्मिक आघाडीचे ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आषाढीला होणाऱ्या महापूजेला विरोध केला आहे. या विरोधामुळे पुन्हा भाजप शिवसेना आमने सामने येण्याची शक्यता आहे.

Ashadhi Ekadashi News
BJP Vs ShivsenaUBT : ''... म्हणून 27 जुलै 'आंतरराष्ट्रीय देशद्रोही दिन' घोषित करा!''; 'या' भाजप नेत्याची युनोकडे मागणी

चंद्रभागा(Chandrabhaga River) पात्राची विविध वारकरी संघटनांनी एकत्रित येत स्वच्छता केली. या स्वच्छता मोहिमेदरम्यान जोगदंड महाराज यांनी राज्यातील भाजप शिवसेना सरकारला घरचा आहेर दिला आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी नमामि चंद्रभागेचा आराखडा सादर करुनच आषाढीच्या शासकीय महापूजेला यावे, अन्यथा मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पावणार नाही असंही जोगदंड म्हणाले आहेत.

पंढरपूर येथील चंद्रभागा नदी व पात्रामध्ये नेहमी अस्वच्छता ‌असते. पात्रातील दुर्गंधी पाणी आणि कचऱ्याच्या प्रश्न नेहमी ऐरणीवर येतो. यंदाच्या आषाढी वारीच्या निमित्ताने यापूर्वीच नगरपालिकेने नदीपात्राची स्वच्छता केली होती त्यानंतर आज पुन्हा विविध वारकरी संघटनांनी एकत्रित येत नदीपात्राची स्वच्छता केली यादरम्यान जवळपास 20 ते 25 टन कचरा गोळा केला.

Ashadhi Ekadashi News
Municipal commissioner News : क्रिकेट स्टेडियमसाठी आयुक्त घेणार बीसीसीआयचे सचिव शहांची भेट ..

चंद्रभागेच्या स्वच्छतेकडे शासनाचे व स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे यापूर्वीच्या सरकारने नमामी चंद्रभागा ही संकल्पना जाहीर केली आहे. यासाठी निधीची देखील तरतूद केली आहे. परंतू, अद्याप यावर कोणतेही काम झाले नाही किंवा तसा आराखडा देखील प्रसिद्ध करण्यात आला नाही. हा मुद्दा आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गाजण्याची शक्यता आहे.

शासन वारकऱ्यांची व भाविकांची हट्ट करत आहे असा थेट आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी यात्रेला येण्यापूर्वी नमामिचंद्र बागेचा आराखडा तयार करूनच पंढरपूरला शासकीय महापूजेसाठी यावे. नाहीतर पांडुरंग त्यांना पावणार नाही असे सांगत मुख्यमंत्र्याच्या पूजेला वारकऱ्यांचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप(Bjp)च्या एका आध्यात्मिक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना हा इशारा दिल्याने याची राज्यभरात आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com