prakash ambedkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra politics: घाईघाईत निर्णय घेऊ नका चार दिवस थांबा; एकनाथ शिंदेंनी प्रकाश आंबेडकरांना धाडला निरोप

Eknath Shinde News : प्रकाश आंबेडकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधत सरकारला खडे बोलू सुनावले आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News : न्यायालयाच्या आदेशानंतर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यातच या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधत सरकारला खडे बोलू सुनावले आहेत. त्यासोबतच यावेळी त्यांनी ठाणे महापालिकेतील शिवसेनेसोबतच्या युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

माणिकराव कोकाटे यांना पोलिसांनीच पळवले. मंत्री गायब झाला असेल तर जनतेचे काय? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून कोकाटे यांना लपवलेले आहे, अशी परिस्थिती आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते.

दोन वर्षाची शिक्षा झाली तर मताचा अधिकार संपुष्टात येतो. सर्वच निवडणुकीसाठी बंदी राहते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोर्टालाही मानत नाही आणि न्यायही अशी असणारी ही परिस्थिती, असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

महापालिका निवडणुकीवरून बोलताना नगरपालिकेला भाजप सोडुन युती झाली महानगरपालिका देखील भाजप सोडुन आघाडी करू. ठाण्यात शिंदे गटाने चार दिवस थांबण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्यासोबतही चर्चा होऊ शकते. संकपाळ यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, त्यांच्या मुलीच्या इंग्लंडमधील शिक्षणाविषयी चर्चा झाली. ठाकरे यांच्या शिवसेनेने मनसेसोबत जाऊन स्वतःची पत घालवून घेतली आहे. शिवसेनेपासून कोकणातील कुणबी, माथाडी कामगार, अमराठी वर्ग दूर झाला असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

राजकारणात असताना सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात, मात्र ज्या गोष्टी देशाच्या हिताच्या नसतात त्या सार्वजनिक मांडायच्या नसतात. पृथ्वीराज चव्हाण यांनी हे पथ्य पाळण गरजेचे आहे, असे देखील आंबेडकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT