NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादीची युती कन्फर्म! अजितदादांच्या शिलेदाराची अमित शाहांशी चर्चा : दिल्लीतून ग्रीन सिग्नल

municipal election : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून सर्वच राजकीय पक्ष अॅक्शन मोडवर आले आहेत. अशातच दिल्लीत राज्याचे राजकीय वातावरण तापवणाऱ्या घडामोडी घडताना दिसत आहेत
Maharashtra municipal elections politics; Sunil Tatkare Delhi meeting with Amit Shah
Maharashtra municipal elections politics; Sunil Tatkare Delhi meeting with Amit Shahsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

  2. अमित शाह यांची राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी दिल्लीतील भेट चर्चेत आली आहे.

  3. भाजप–राष्ट्रवादी युतीबाबत पुन्हा एकदा राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

New Delhi News : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजलं असून सर्वच राजकीय पक्ष अॅक्शन मोडवर आले आहेत. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल युती होणार नसल्याची घोषणा करत मैत्रिपूर्ण लढती होतील असे सांगितले. यानंतर आता दिल्लीत राज्याचे राजकीय वातावरण तापवणाऱ्या घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीच भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट घेतली आहे. तर या भाजप-राष्ट्रवादीच्या युतीबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील रखडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर करणारी पत्रकार परिषद राज्य निवडणूक आयोगाने घेतली. यानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. यावेळी पुण्यासह काही ठिकाणी भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेईल. पण राष्ट्रवादीला नाही. तेथे मैत्रिपुर्ण लढती होतील, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले होते. ज्यानंतर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीने ठाणे महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

यादरम्यान अमित शाह यांची प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी भेट घेतली आहे. त्यांनी शाह यांच्याबरोबर जवळपास 15 मिनिटे चर्चा केली आहे. या बैठकीत राज्यात जिथे युती करणे शक्य असेल तिथे युती करा, अशा सूचना अमित शाह यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांना दिल्या आहेत.

Maharashtra municipal elections politics; Sunil Tatkare Delhi meeting with Amit Shah
NCP Politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सोडली महायुतीची साथ! ठाणे महापालिका स्वबळावर लढणार

त्याचबरोबर याच बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत दादांच्या राष्ट्रवादीने युती केल्यास काहीच हरकत नसल्याचेही शाह यांनी म्हटले आहे. यामुळे आता राज्यात आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीबाबत काहीच हरकत नसल्याचे सांगताना राज्यातील भाजप नेतृत्वाबोरबर चर्चा करण्याचे देखील आश्वासन अमित शाह यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंना दिले आहे. दरम्यान आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचीही चर्चा आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

राज्यातील महापालिकेच्या निवडणूका जाहीर होताच पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले होते. यावेळी त्यांनी राज्यातील बहुतांश ठिकाणी भाजप शिवसेनाला सोबत घेणार आहे. मात्र पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीविरूध्द लढेल.

येथे राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्र लढू शकणार नाहीत. आमची याबाबत अजितदादांशी चर्चा झालीय. तर येथे महायुती म्हणून लढल्यास याचा फायदा विरोधकांना होणार आहे. यामुळेच विरोधकांऐवजी आम्हीच एकमेकांच्या विरोधात लढणार असून ती मैत्रीपूर्ण लढत होईल असेही त्यांनी म्हटले होते.

Maharashtra municipal elections politics; Sunil Tatkare Delhi meeting with Amit Shah
NCP Ajit Pawar Politics: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नाशिकमध्ये पुन्हा एक धक्का, डॉ. झाकीर शेख यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश!

FAQs :

1. भाजप–राष्ट्रवादी युतीबाबत चर्चा का सुरू झाली आहे?
➡️ अमित शाह आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या दिल्ली भेटीनंतर युतीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

2. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय स्पष्ट केले होते?
➡️ त्यांनी राष्ट्रवादीसोबत युती होणार नसून मैत्रीपूर्ण लढती होतील असे सांगितले होते.

3. दिल्ली भेटीत कोणकोण सहभागी होते?
➡️ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते.

4. या भेटीचा निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
➡️ युतीबाबत संभ्रम वाढून राजकीय समीकरणे बदलू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com