Eknath Shinde News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde News : नक्षल्यांनी एकनाथ शिंदेंची हत्या करावी असंच तुमच्या मनात... ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर गंभीर आरोप!

Chetan Zadpe

Kolhapur News : कोल्हापूर येथे शिवसेनेचे महाअधिवेशन काल शुक्रवारपासून (ता. १६ फेब्रुवारी) सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. या वेळी त्यांनी ठाकरे सरकारमध्ये मला सुरक्षा नाकारण्यात आली होती, असा दावा केला. तसेच माझी हत्या व्हावी असं तर तुमच्या मनात नव्हतं ना अशी शंका त्यांनी बोलून दाखवली. (Latest Marathi News)

अनेक धमक्या आल्या -

एकनाथ शिंदे म्हणाले, "मला आयुष्यभर आजवर अनेक धमक्या आल्या. मी कधी धमक्यांना घाबरलो नाही. नक्षलवाद्यांच्या धमक्या आल्या. दाऊदने धमकी दिली, छोटा शकीलने धमकी दिली. सगळे धमक्या देऊन गेले. दिघेसाहेब असतानाही खूप झालं. मात्र, धर्मवीर आनंद दिघे माझ्या पाठीशी होते म्हणून माझ्या केसालाही कधी धक्का लागला नाही."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरेंवर गंभीर आरोप -

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "आमचे मंत्री शंभूराज देसाई यांना त्या सरकारमध्ये (ठाकरे सरकार) असताना तपास यंत्रणांनी सांगितलं, की एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा द्या. त्यांनी आणि मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) यांनी मीटिंग घेतली. मात्र, कारवाई शून्य. ठाकरेंनी शंभूराज यांना सांगितलं की त्यांना सुरक्षा देऊ नका. त्यावेळी मुख्यमंत्री मला म्हणाले, की कागदपत्रांची कार्यवाही न करता मी सुरक्षा पाठवतो. मी ठाकरेंना म्हणालो, तुमची सुरक्षा तुमच्याकडे राहू द्या. माझ्याकडे जे पोलिस आहेत, त्यांनाही घेऊन जा. मी डरपोक नाही. आता मला अशी शंका आहे की, तेव्हा काय तुमच्या मनामध्ये होतं? नक्षल्यांनी या एकनाथ शिंदेंची हत्या करावी? काट्याने काटा काढावा. असं होतं का?" असा सवाला शिंदेंनी ठाकरेंना विचारला.

शिवसेना सर्वस्व -

"शिवसेना (Shiv Sena) हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटुंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं, पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती, नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते, पण श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला," असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT