Kolhapur News : कोल्हापूर ते नागपूर अशा 800 किलोमीटरचा होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला आता कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातूनही विरोध होऊ लागला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला वगळण्यात आल्याचे राजपत्र आदेश काढल्यानंतर पुन्हा एकदा राज्य सरकारकडून जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्ग करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
सत्तेतील आमदारांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह शक्तिपीठ महामार्गाबद्दल येणाऱ्या वक्तव्याने बाधितांमधील काही शेतकऱ्यांचा विरोध समोर आल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत. तर शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती देखील आक्रमक झाली आहे. 5 एप्रिल रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांची सभा उधळण्याचा इशारा शक्तीपीठ विरोधी कृती समितीने दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून रद्द झाल्याचा आदेश निघाल्यानंतर पुन्हा एकदा राज्य सरकारकडून घूमजाव केला जात आहे. सुरुवातीला विरोध करणाऱ्या मंत्र्यांनी आता शक्तिपीठ समर्थनार्थ वक्तव्य केले आहे. त्यामुळे शक्तिपीठ विरोधी कृती समितीकडून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग केला जाणार असल्याने पुन्हा एकदा कृती समितीकडून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान राधानगरी आणि गारगोटी येथील सभेदरम्यान शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासंदर्भातचा शब्द दिला होता. तर शक्तिपीठ विरोधी कृती समितीला कोल्हापूर विमानतळावर शक्तिपीठ महामार्गाबाबत विरोध असेल तर तो करणार नाही, असाही शब्द तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता, असा दावा शक्तिपीठ विरोधी कृती समितीने करत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे.
राधानगरी भुदरगड मतदारसंघातील आमदार पालकमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांच्या विजयानंतर आभार मेळावा येत्या पाच एप्रिल रोजी पार पडणार आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे होणाऱ्या या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातून होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवत हा मेळावा उधळून लावण्याचा इशारा शक्तिपीठ विरोधी कृती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. प्रचारादरम्यान शब्द देऊन तो फिरवत असाल तर तुम्ही शेतकऱ्यांना फसवत आहात, असा आरोप गिरीश फोंडे यांनी केला.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.