Tanaji Sawant : शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; धाराशिवमधील मेळाव्याप्रसंगी तानाजी सावंतांचा फोटो बॅनरवरून गायब

Dharashiv rally News : मेळाव्याप्रसंगी लावण्यात आलेल्या पोस्टरवरून तानाजी सावंतांचा फोटो गायब दिसला. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
Tanaji Sawant News
Tanaji Sawant NewsSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये गेल्या अडीच वर्षाच्या काळात राज्याचे आरोग्यमंत्री असलेल्या तानाजी सावंत यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. त्यावेळेसपासून ते नाराज आहेत. गेल्या तीन महिन्यात त्यांची नाराजी दूर झालेली नाही. त्यामुळे त्यांनी मतदारसंघात जाणे टाळले असून त्याशिवाय कुठल्याच पक्षाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावलेली नाही.

त्यातच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थित गुरुवारी धाराशिव जिल्ह्यातील महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याप्रसंगी लावण्यात आलेल्या पोस्टरवरून तानाजी सावंतांचा फोटो गायब दिसला. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची नाराजी गेल्या काही दिवसापासून दूर राहिलेली नाही. मंत्रिपद मिळाले नसल्याने ते कुठल्याच कार्यक्रमाला जात नाहीत. जिल्ह्यातील सर्वच कार्यक्रमाला दांडी मारत असल्याने त्यांची नाराजी दिसून येत आहे.

Tanaji Sawant News
Ajit Pawar Politics: शेतकरी कर्जमाफीचा फास सरकारच्या गळ्याला...अजित पवार होणार टार्गेट?

त्यातच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे ठाण्यातील मंत्री प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर त्यांनी धाराशिव जिल्ह्यात अनेक कार्यक्रम घेतले. मात्र, सावंत कुठल्याच कार्यक्रमाला येत नाहीत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी मात्र या निमित्ताने चव्हाट्यावर आली आहे.

Tanaji Sawant News
Ajit Pawar: अजितदादांच्या पदाधिकाऱ्यावर बलात्कार अन् धर्मांतराचा आरोप; चाकणकरांनी केल्या पोलिसांना 'या' महत्त्वाच्या सूचना

धाराशिव जिल्ह्यातील महिलांचा मेळावा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याप्रसंगी लावण्यात आलेल्या पोस्टरवरून तानाजी सावंतांचा फोटो गायब दिसला. शिंदेंच्या शिवसेनेतील सर्व नेत्याचे फोटो बॅनरवर लावण्यात आले होते. मात्र, तानाजी सावंत यांचा फोटो या बॅनरवर लावण्यात आला नव्हता. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सावंत गटाच्या नेत्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली.

Tanaji Sawant News
PM Modi Strategy: पंतप्रधान मोदींचा मास्टर स्ट्रोक! वक्फ विधेयकाच्या मंजुरीने निवडणुकांच्या निकालावर परिणाम?

या मेळाव्याच्या निमित्त्ताने धाराशिवमधील शिंदे शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान, पालकमंत्री असताना गेल्या अडीच वर्षाच्या काळात तानाजी सावंत यांनी नेहमीच कुरघोडीचे राजकारण केले होते. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विरोधक निर्माण झाले आहेत. त्याचा फटका त्यांना येत्या काळात सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता येत्या काळात नाराज असलेले तानाजी सावंत आता काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Tanaji Sawant News
Mahayuti Government 100 Day Plan : राज्य सरकारचा 100 दिवसाचा कृती कार्यक्रम मुदतवाढीनंतर तरी पूर्ण होणार का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com