Dhairyasheel Mohite Patil-Shivsena Leader Sarkaranama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena-NCP SP Yuti : सोलापुरात नवे राजकीय समीकरण; शिंदेसेना अन्‌ पवारांच्या राष्ट्रवादीची युती, मोहिते पाटील-कोकाटेंचा पुढाकार

Kurduwadi Nagar Parishad Election : कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हातमिळवणी केली असून सोलापूर जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण घडले आहे.

Vijaykumar Dudhale, अक्षय गुंड
  1. कुर्डुवाडीतील नवी युती:
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

  2. महत्त्वाच्या नेत्यांचा सहभाग:
    या युतीला खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार नारायण पाटील आणि शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी हिरवा कंदिल दिला आहे.

  3. राजकीय समीकरणे बदलली:
    शिंदे-पवार युतीमुळे कुर्डुवाडीतील राजकारण ढवळून निघाले असून, धनंजय डिकोळे, संजयमामा शिंदे आणि भाजप या तिन्ही बाजूंकडून नव्या चाली खेळल्या जात आहेत.

Solapur, 12 November : नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंंगाने राज्यात जोरदार घडामोडी घडत आहेत. पक्षप्रवेश आणि शह-कटशहाच्या राजकारणाला ऊत आला आहे. राजकीय पक्षांकडून विशेषतः महायुतीमधील पक्ष एकमेकांना चेकमेट करण्यात गुंतल्याचे दिसून येते. त्यातून काही ठिकाणी विरोधकांशी हातमिळवणी केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात कुर्डुवाडी नगरपरिषदेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युतीला खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार नारायण पाटील, तर शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांना हिरवा कंदिल दाखवला आहे. या नेतेमंडळींमधील चर्चेनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यावर महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाची काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागणार आहे.

कुर्डूवाडी नगरपरिषदेवर शिवसेना पूर्वीची शिवसेना आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते धनंजय डिकोळे यांची गेली वीस ते पंचवीस वर्षांपासून सत्ता आहे. धनंजय डिकोळे यांची कुर्डूवाडी शहरात मोठी ताकद आहे. डिकोळे यांच्या गडाला शह देण्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP SP) एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

कुर्डूवाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची युती करण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांच्याशी युतीबाबत चर्चा केली. त्यानंतर आमदार नारायण पाटील आणि शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी होकार दर्शविली. त्यामुळे सोलापुरात तुतारी आणि धनुष्यबानाची युती झाली आहे.

या वेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख तात्यासाहेब गोडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख आनंद टोणपे, शिवसेना शहर प्रमुख संभाजी सातव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष दत्ताजी गवळी, माजी नगरसेवक लतीफ भाई मुलाणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किसान सेल जिल्हाध्यक्ष शंकर बागल यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर निवडणुकीत एकत्रितपणे सामोरे जाण्याचा निर्णय जाहीर केला.

एकीकडे शिंदेची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने कुर्डुवाडी शहरात राजकीय चर्चांना उधाण आली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटासोबत युती केली आहे. डिकोळे हे स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहेत. भाजपही शांत दिसत आहे.

Q1: कुर्डुवाडी नगरपरिषदेसाठी कोणत्या पक्षांनी युती केली आहे?
A1: शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी युती केली आहे.

Q2: या युतीला कोणत्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे?
A2: धैर्यशील मोहिते पाटील, नारायण पाटील आणि संजय कोकाटे यांनी या युतीला हिरवा कंदिल दिला आहे.

Q3: धनंजय डिकोळे कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत?
A3: धनंजय डिकोळे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी संबंधित आहेत आणि स्वतंत्र लढत आहेत.

Q4: कुर्डुवाडीतील भाजपची भूमिका काय आहे?
A4: भाजप सध्या शांत भूमिका घेत असून, परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT