Satara Collector santosh Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP Update : सभापती निवडीसाठी सातारच्या कलेक्टरांनी घेतला कडक निर्णय; झेडपीच्या 100 मीटर परिसरात...

Satara Collector's Major Decision : सभापती निवडणुकीपूर्वी साताऱ्यात कडक सुरक्षा लावण्यात आली असून 100 मीटर परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे, त्यामुळे प्रशासन सतर्क झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Vijaykumar Dudhale

Satara, 03 April : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना मतदान करू न देता झालेली अटक आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी धक्काबुक्की यामुळे सातारची निवडणूक राज्यात गाजली. तसेच सभागृहात मतदान करण्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका यामुळे सातारचे एसपी तुषार दोशी आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील हे टीकचे धनी झाले होते.

आता सभापती निवडणुकीसाठी (Sabhapati Election) त्यांनी कडक पाऊले उचलली असून झेडपी सदस्य, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी आणि बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी वगळता इतर सर्व व्यक्तींना १०० मीटर परिसरात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.

सातारा (satara) जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी गोंधळाचे वातावरण होत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता, त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांसह संपूर्ण प्रशासनाची नाचक्की झाली होती. त्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी होणाऱ्या सभापती निवडीत पुन्हा राजकीय नेते व कार्यकर्त्यांच्या गर्दीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी आणि बंदोबस्तावरील पोलिस अधिकाऱ्यांना वगळता इतर सर्व व्यक्तींना १०० मीटर परिसरात प्रवेशास मनाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

या विशेष सभेत समाजकल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती, तसेच इतर दोन विषय समित्यांच्या सभापतिपदांच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वी २० मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. विविध पक्षांचे मंत्री आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्तासह आरसीपी पथकांची मदत घ्यावी लागली होती. या पार्श्वभूमीवर चार एप्रिलच्या सभेत प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद इमारतीच्या १०० मीटर परिसरात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून, तो सकाळी सातपासून सभा संपेपर्यंत लागू राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT