

Satara, 31 March : सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी निकालानंतर दोन दिवसांनी केली होती आणि ती घोषणा त्यांनी भाजपकडे बहुमत नसतानाही पूर्ण करून दाखवली होती. त्यानंतर आता विषय समित्यांच्या सभापतिपदाबाबत तशीच घोषणा गोरे यांनी केली आहे, त्यामुळे पालकमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांच्या रणनीतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीच्या वेळी बहुमत नसतानाही जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी जाहीर केलेला शब्द खरा करून दाखवला, त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत गोरे कोणती खेळी करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गोरे म्हणाले, महायुती म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असं आमचं मत आहे, त्यातूनही एकत्र आलो नाही तर सातारा जिल्हा परिषदेत (Satara Zilla Parishad) भारतीय जनता पक्षाचेच सभापती झाले पाहिजेत, ही माझी भावना आहे.
गोरे म्हणाले, माझं पहिल्यापासून सांगण होतं, सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होईल, त्यानुसार आमच्याकडे जादूचा आकडा आला. सध्याही आमच्याकडे ३३ सदस्य आहेत. अगदी अटक झालेल्या त्या दोन सदस्यांनी जरी मते दिली असती तरी ३० अधिक दोन ३२ झाले असते. आमचे ३३ सदस्य होतात. त्यामुळे यावर वाद उपस्थित करणे योग्य नाही.
सातारा जिल्हा परिषदेत भाजपच्या बाजूने ३३ सदस्य झाले, त्यामुळे काही लोकांना त्यामध्ये बाधा निमार्ण करायची होती. आता सभापतिपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणार का, यावर ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सांगितले की, सभापतिपदाच्या निवडणुकीत त्यांना बरोबर घेणारा मी कोण..? उलट मलाच कोणीही बरोबर घेत नाही.
महायुती म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या तीनही पक्षांनी एकत्र येऊन काम करावे, असं आम्हाला वाटतं. हे तीनही पक्ष एकत्र आलो नाही तरी जिल्हा परिषदेतील विषय समित्यांचे सभापती हे भारतीय जनता पक्षाचेच झाले पाहिजेत, ही माझी भूमिका आहे, असे गोरे यांनी नमूद केले.
शंभूराज देसाई माझे चांगले मित्र : जयकुमार गोरे
सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत जयकुमार गोरे म्हणाले, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मी चांगले मित्र आहोत. आम्ही एकाच मंत्रिमंडळात काम करतो. आमची ही लढाई वैयक्तिक नसून केवळ राजकीय आहे. ते त्यांच्या पक्षाचे काम करत आहेत आणि मी माझ्या पक्षाचे. महायुती म्हणून सर्वांनी एकत्र यावे, ही आमची भूमिका आहे. पण, भाजपचा सभापती व्हावा, ही माझी ठाम भावना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.