

Solapur, 03 April : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन सोलापूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पदभार स्वीकारला. नागपूरचे नवे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून कार्तिकेयन यांनी जिल्हा प्रशासनाची सूत्रे स्वीकारली. मावळते जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी नवे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कुमार आशीर्वाद यांची नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. त्यानंतर आशीर्वाद यांच्या जागी सोलापूरचे जिल्हाधिकारी (Solapur Collector) म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांची नियुक्ती गुरुवारी सायंकाळी करण्यात आली आहे. राज्याचे सहसचिव सुभाष उमारणीकर यांनी बदलीचे आदेश पारित केले आहेत.
एस. कार्तिकेयन हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०२० बॅचचे (आयएएस) महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. कार्तिकेयन हे यापूर्वी कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्याठिकाणाहून त्यांची सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारीपदाचा त्यांची पहिलीच नियुक्ती आहे.
मूळचे तामिळनाडूचे कार्तिकेयन यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले आहे. नाशिक आणि नंदूरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून, तर नाशिक येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. कोल्हापूर झेडपी सीईओ होण्यापूर्वी त्यांनी पुण्यात अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार सांभाळला आहे.
दरम्यान, कोल्हापूरहून सोलापूरला येताना नवे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी पहिल्यांदा पंढरपूरला जात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्या शकुंतलाताई नडगिरे व नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांचा उपरणे व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार केला.
यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, त्या कामाची माहिती कार्तिकेयन यांनी घेतली. मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या व करण्यात आलेल्या कामांची माहिती या वेळी दिली.
यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले उपस्थित होते. पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यानंतर सोलापुरात मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून एस. कार्तिकेयन यांनी पदभार स्वीकारला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.