Solapur, 25 May : सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या नावाने व्हीएतनाम आणि थायलंड या देशातून सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून त्याद्वारे पैशांची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी स्वतः सायबर सेलकडे यातबाबतची तक्रार नोंदविली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर माझे बनावट खाते तयार करून त्याद्वारे पैशांची मागणी करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांनी या खोट्या अफवेला बळू पडू नये, असा कोणताही पैशाचा व्यवहार करू नये, असे आवाहन खुद्द सोलापूरचे (Solapur)जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. (Karthikeyan S.) यांचे नाव, पदनाम व छायाचित्र वापरून सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे. या बनावट खात्यामार्फत काही व्यक्तींना पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.
सोशल मीडियावरील बनावट खात्याबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले, माझ्याकडून किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही नागरिकांकडे आर्थिक व्यवहार किंवा पैशाची मागणी केली जात नाही. बनावट खाते आणि त्यावरील फोटो, संदेशांमुळे नागरिकांची फसवणूक होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी खोट्या संदेशाला बळी पडू नये. कोणत्याही संशयास्पद संदेशाची माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी.
त्या बनावट खात्यात जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम आणि छायाचित्र वापरून हे खरे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका व्हॉट्स ॲप प्रोफाईलवर Collector & District Magistrate अशी नोंद करून नागरिकांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी स्वतः सायबर सेलमध्ये याबाबतची तक्रार दिली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी सायबर सेल मार्फत गुन्ह्याची तपासणी सुरू केलेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.