Prakash Ambedkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

INDIA Aghadi News : नितीशकुमारांनी राजीनामा देताच आंबेडकरांचा मोठा दावा; ‘इंडिया आघाडीचे भवितव्य संपले...’

Prakash Ambedkar's claim: काँग्रेस पक्ष एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याचे काम करत आहे.

अक्षय गुंड

Madha News : काँग्रेसच्या ताठरपणामुळे इंडिया आघाडीचे  राष्ट्रीय पातळीवरचे भवितव्य संपले आहे, अशी भूमिका वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे आयोजित पत्रकारपरिषदेत मांडली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेताच आंबेडकर यांनी ही भूमिका मांडल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. (Fate of India Aghadi at the national level is over : Prakash Ambedkar)

ओबीसी समाजाचा सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे मेळावा सुरू आहे. त्या मेळाव्याला आल्यानंतर माध्यमांशी बोलताना ॲड. आंबेडकर यांनी इंडिया आघाडीबाबत मोठे भाष्य केले. त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीला भवितव्य राहिले नसल्याचे सांगितले. त्यावरून काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस पक्ष एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याचे काम करीत आहे. एकीकडे राहुल गांधी यांच्यामार्फत पक्ष वाढविण्याचे काम चालू आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पुढे करण्याचे काम सुरू आहे, असेही निरीक्षण प्रकाश आंबेडकर यांनी नोंदविले.

भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगाल, बिहार या ठिकाणहून जाणार आहे. त्या ठिकाणी प्रमुख असलेले तृणमूल कॉंग्रेस व जेडीयू यांना त्या यात्रेत सामावून घेतले जात नाही. त्याच ठिकाणी पक्षवाढीचा कार्यक्रम हाती घेऊन काँग्रेस इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांना राजकीयरीत्या धमकाविण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेसच्या अशा भूमिकेमुळेच अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि आता नितीशकुमार यांनी वेगळी वाट धरली आहे, त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे भवितव्य संपले आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

इंडिया आघाडीत जे झाले; ते महाविकास आघाडीत होऊ देणार नाही

महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून तीस जानेवारीला होणाऱ्या बैठकीसाठीचे निमंत्रण आम्हाला मिळाले आहे. त्या बैठकीला आम्ही जाणार आहोत, त्यात आम्ही आमचे मुद्दे मांडू. काही मुद्द्यांवर मतभेद असतील, तर ते चर्चेतून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येतील. पण, राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे जे झाले, ते महाविकास आघाडी आणि आमच्यात होऊ नये, यासाठी नक्की प्रयत्न करू, असा शब्दही आंबेडकर यांनी यावेळी दिला.

ओबीसी-मराठा दरी वाढू नये

गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी आणि मराठा समाजात दरी निर्माण झाली आहे. यापुढील काळात ती वाढू नये, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT