Miraj Pattern : सांगलीत पुन्हा ‘मिरज पॅटर्न’चा डाव; अजितदादा वाढवणार जयंतरावांची डोकेदुखी

Ajit Pawar Vs Jayant Patil : दुसऱ्याच्या गटात हस्तक्षेप करायचा नाही आणि महापालिकेतील सत्तेसाठी एकत्र येऊन कारभार करायचा, असा हा मिरज पॅटर्न आहे.
Ajit Pawar-Jayant Patil
Ajit Pawar-Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli politics : सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात मागील काही वर्षांत ‘मिरज पॅटर्न’चा अनेकांनी धसका घेतलेला आहे. या पॅटर्नचा अंदाज लावणे महाकठीण काम आहे. मिरजेत माजी महापौरांचे तीन गट आहेत. राजकारणातील अनेक नेत्यांना या पॅटर्नचा अनुभव आहे. सर्व पक्षातील नेते आता ताकही फुंकून पितात. राष्ट्रवादीतील फुटीनंतर मिरजेत नवे राजकारण उदयास येत आहे. राष्ट्रवादीतील एका माजी महापौरांनी अजितदादा गटात प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या महापौराची चालही त्याच दिशेने आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सोयीच्या राजकारणासाठी ‘मिरज पॅटर्न’ची खेळी सुरू झाल्याचे दिसून येते. त्यामुळे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. ('Miraj pattern' again in Sangli: Ajitdada will increase Jayantrao's headache)

मिरजेचे राजकारण हे वेगवेगळ्या पद्धतीने चालत आल्याचे आजपर्यंतचा इतिहास आहे. तेथील काँग्रेसचे माजी महापौर किशोर जामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर इद्रिस नायकवडी व मैनुद्दीन बागवान, माजी स्थायी सभापती सुरेश आवटी यांच्याभोवती फिरत राहिले आहे. ते कोणत्याही पक्षावर अवलंबून राहत नाही, तर प्रत्येकाच्या गटावर अवलंबून असते. यामध्ये दादा गट, बापू गट, नायकवडी गट या गटांच्या पुढे मिरजेचे राजकारण जातच नाही. (Miraj pattern)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar-Jayant Patil
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या निर्णयावर नारायण राणे नाराज? म्हणाले, 'सरकारच्या निर्णयाशी...'

प्रत्येकजण महापालिका निवडणुकीत आपापला हातचा राखून ठेवतो. आर्थिक गणित जिथे जमते, तेथेच गट सक्रिय झाल्याचे आतापर्यंतचा इतिहास आहे. पक्षाचे चिन्ह न घेताही त्यांनी आपली बलस्थाने शाबूत ठेवली आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षातील नेता ‘मिरज पॅटर्न’बाबत दबक्या आवाजात बोलत असतो. कारण, पक्षातील नेत्यांनाही सोयीस्कररीत्या राजकारण करताना या गटांचा उपयोग करून घेतात.

Ajit Pawar-Jayant Patil
BJP Election Incharge : भाजपने जावडेकरांवर सोपवली अवघड; पण महत्त्वपूर्ण जबाबदारी

प्रभागातील निवडणूक असो अथवा महापौर निवडणूक. आपापल्या सोयीनुसार सर्वकाही ठरत असते. प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही या पॅटर्नचा अंदाज येत नाही. आज एकाबरोबर गट असतो, तर नंतर दुसऱ्यासोबत गट सक्रिय असतो. पॅटर्नमध्ये प्रत्येकाने आपल्या सोयीस्कररीत्या राजकारण करण्याचे ठरवले आहे.

दुसऱ्याच्या गटात हस्तक्षेप करायचा नाही आणि महापालिकेत सर्वांनी एकत्र येऊन कारभार करायचा, सत्ता राबवायची, असा हा अलिखित पॅटर्न आहे. तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो, हे येथील राजकारण्यांचे डावपेच सर्वश्रुत आहेत. आगामी लोकसभा असो, अथवा विधानसभा निवडणूक किंवा महापालिका निवडणूक आतापासूनच प्रत्येक गट प्रत्येक पक्षातील नेत्याला भेटून येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजितदादा गटाने मिरजमध्ये पाय पसरले आहेत. माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी दादा गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना ‘अल्पसंख्याक सेल’चे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. सत्तेतील दादा गटात पद आणि कामे होत असल्याने अनेक नेत्यांना दादा गटाची भुरळ पडली आहे.

Ajit Pawar-Jayant Patil
Chandrakant Patil : चंद्रकांतदादांनी सोलापुरात केले फडणवीसांचे काम...

जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनीही अजितदादांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांचा प्रवेशही लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र त्यांच्या प्रवेशाबाबत अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवडी नाराज आहेत. कुणाचा प्रवेश घ्यायचा आहे, हे अजितदादा मला विचारतील, असे सांगत बागवान यांच्या प्रवेशाला उघडपणे विरोध दर्शवला आहे. मात्र, बागवान यांच्या भूमिकेने जयंतरावांची डोकेदुखी वाढली आहे.

Ajit Pawar-Jayant Patil
Rane Solapur Tour : ‘मी अन्‌ महेश लांडगे ट्रेलर आहोत; सोलापुरातही लवकरच दिसेल देवाचा बुलडोझर’

बागवान यांना भेटण्याचे कारण आपल्याला शहरचा विकास करायला निधी पाहिजे त्यासाठी सत्ताधाऱ्यांना भेटल्याचे सांगतात. विकास निधी हा सोयीस्कररीत्या वापरण्यात येतो. राज्यातील राजकीय घडामोडींवरून हा गट सक्रिय होत असतो. मिरज पॅटर्न म्हणजे राजकारणातील एक होकायंत्र आहे. राजकारणाची दिशा आणि वारे होकायंत्राला समजल्यानंतर त्याप्रमाणे सर्वजण ॲडजस्टमेंट करीत असतो. प्रत्येक गट आपला बालेकिल्ला शाबूत ठेवून आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षातील नेते या पॅटर्नचा अभ्यास करूनच पुढील राजकारण करीत असल्याचे दिसून येते.

Edited By : Vijay Dudhale

R...

Ajit Pawar-Jayant Patil
Solapur Crime : माजी आमदार आडम यांच्या कार्यालयात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com