Madha Loksabha News : 'माढा'साठी रणनीतीचे केंद्र बदलले ? शिलेदार पुन्हा 'डिनर डिप्लोमसी'तून एकत्र...

Meeting of the leaders of Mahayuti : गत निवडणुकीत बोराटवाडी येथील आमदार जयकुमार गोरेंचे निवासस्थान होते केंद्रस्थानी.
Meeting of the leaders of Mahayuti
Meeting of the leaders of MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Madha Loksabha News : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक माढा लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला होता. येथे सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुकांसह वरिष्ठ, तसेच घटकपक्षातील नेत्यांनी बैठकांवर जोर धरला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार बबन शिंदेंच्या निमगाव येथील बंगल्यावर खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार संजय शिंदे यांची बैठक पार पडली.

यात निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आल्याची शक्यता आहे. गतनिवडणुकीतील शिलेदार 'डिनर डिप्लोमसी'तून पुन्हा एकत्र आले आहेत. मात्र, त्यावेळी बोराटवाडी हे आमदार जयकुमार गोरे यांचे निवासस्थान केंद्रस्थानी होते. यावेळी निमगाव येथील बबन शिंदे यांच्या बंगल्यावर बैठक झाली आहे. त्यामुळे 'माढा'साठी रणनीतीचे केंद्र बदलले आहे की काय असे चित्र आहे, तर पुन्हा एकदा 'डिनर डिप्लोमसी'द्वारे शिलेदार एकत्र आल्याची चर्चा आहे.

Meeting of the leaders of Mahayuti
Modi's Guarantee Nitish Surrender : पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीवर नितीशकुमार यांचा शिक्का

राष्ट्रवादीचे शरद पवारांनी प्रतिनिधित्व केलेल्या माढा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला यश आले. रणजितसिंह नाईक - निंबाळकर या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्या नावाला झुकते माप दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर महायुतीचा नव्याने घटकपक्ष झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील हेवीवेट नेते रामराजे नाईक - निंबाळकर यांनी अकलूजमध्ये विजयदादा मोहिते - पाटलांची भेट घेतल्यावर चर्चांना उधाण आले होते. एका बाजूला अकलूजचे धैर्यशीलदादा मोहिते - पाटील आणि रामराजेंचे बंधू माजी जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक - निंबाळकर माढा लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर आणि आमदार रामराजे नाईक - निंबाळकर यांच्या राजकीय वैर सर्वांनाच माहीत आहे. दोघे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. रणजितसिंहांना पुन्हा उमेदवारी मिळू द्यायची नाही, असा चंगच रामराजेंनी बांधला असला तरी महायुतीच्या जागावाटपात माढा मतदारसंघ भाजपाकडेच राहण्याची शक्यता अधिक आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच फलटण येथे जाहीर सभा झाली. त्यांनी रामराजेंसह इतरांची भेट घेतली असली तरी रणजितसिंहांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. गत लोकसभा निवडणुकीअगोदर बोराटवाडीत आमदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी बैठका झाल्या होत्या. राजकीय उलथापालथी होऊन रणजितसिंह नाईक - निंबाळकर आणि आ. संजय शिंदे यांच्यात लढत झाली होती. आता पुन्हा तशाच बैठका सुरू झाल्या आहेत.

गोरेंनी त्यावेळी निवडणुकीची सूत्रे हलवली होती. त्या बैठका इतक्या परिणामकारक झाल्या होत्या, की बोराटवाडीत एकत्रित खलबते करणाऱ्यांपैकी रणजितसिंह नाईक - निंबाळकर आणि संजय शिंदे यांमध्ये माढा लोकसभा निवडणुकीची लढत झाली होती. आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बैठका सुरू झाल्या आहेत. मात्र ती आता आमदार बबन शिंदेंच्या निमगाव येथील बंगल्यावर झाली आहे. त्यामुळे 'माढा'साठी रणनीतीचे केंद्र बदलले की काय, असे चित्र आहे.

R...

Meeting of the leaders of Mahayuti
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी; नांदेडमध्ये राजकीय लाभ कोणाला...?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com