Ekanth shinde, Manoj Jarange Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा, मुस्लिम, धनगर, बंजारा एकत्र; जरांगे पाटलांनी बांधली मोट

Jarange Patil मुस्लिम व बंजारा बांधवांचे शिष्टमंडळ आज जरांगे पाटील यांना मायणीत भेटले. त्यांना आरक्षण मागणीसाठी पाठिंबा दिला आहे.

Umesh Bambare-Patil

Jarange Patil News : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा, मुस्लिम, धनगर, बंजारा असे चार लहान मोठे भाऊ एकत्र आलो आहोत. आता सरकारचे काय, त्यांनी विचार करावा. तुम्ही एका एका जातीवर अन्याय करायला लागला तर आम्ही गप्प बसणार नाही. एकमेकांचे विचार जुळत असल्याने आम्ही चार जण एकत्र आलो असून, आमच्यावर अन्याय कराल तर आम्हाला आगामी काळात एकत्र येऊन लढावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

जरांगे पाटील Jarange Patil हे काल मायणी येथे मुक्कामी आले होते. आज सकाळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी आरक्षण मागणीसाठी Maratha Reservation धनगर, बंजारा व मुस्लिम समाजाला पाठिंबा देत असल्याचे सांगून आम्ही एकत्र आलो आहोत. आता सरकारचे काही खरं नाही, असे त्यांनी सांगितले.

मुस्लिम व बंजारा बांधवांचे शिष्टमंडळ आज जरांगे पाटील यांना मायणीत भेटले. त्याबाबत विचारले असता जरांगे पाटील म्हणाले, बंजारा, धनगर बांधवांना आरक्षण मागणीसाठी पाठिंबा दिला आहे. त्यांचे हक्काचे आरक्षण का मिळत नाही, हे पाहू. मस्लिमांचे पाच टक्के आरक्षण आहे. ते त्यांना मिळाले पाहिजे.

आम्ही चार लहान, मोठे भाऊ एकत्र झालो मग सरकारचे काय, हे त्यांनी विचार करावा. तुम्ही एका एका जातीवर अन्याय करायला लागलाय, तो करू नका. ज्याचे त्याचे आरक्षण देऊन टाका. वंजारा बांधवांचेसुद्धा हक्काचे एसटीमध्ये आरक्षण आहे, ते त्यांना द्यायला हवे. त्याची ही मी माहिती घेत आहे. Maharashtra Political News

सरकारने त्यांनाही आरक्षण दिली पाहिजे. आमचे एकमेकांचे विचार जुळत असल्याने आम्ही चार जण एकत्र आलो आहोत. मराठा, मुस्लिम, धनगर, बंजारा एकत्र येत असून अन्याय, कराल तर आम्हाला आगामी काळात एकत्र लढावे लागेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT