Manoj Jarange Patil : शाहू महाराजांच्या भूमीत मनोज जरांगे-पाटलांचा घुमणार आवाज !

Kolhapur Maratha Meeting : सारथी उपकेंद्राबाहेर 19 दिवसांपासून विद्यार्थ्यांचे उपोषण
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : मराठ्यांना ओबीसी आरक्षणाबाबत २४ डिसेंबरपर्यंत दुसरी मुदत दिल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. त्यांना ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे. जरांगे पाटील शुक्रवारी सकाळी वीटा आणि सातारा येथे सभा घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी कोल्हापुरातील मराठा समाजाची भेट घेतील. तेथे दसरा चौकात ते समाजाशी संवाद साधणार आहेत. या सभेला होणाऱ्या गर्दीचे नियोजन करत जोरदार तयारी करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे-पाटील यांचे सायंकाळी पाच वाजता कोल्हापुरातील छत्रपती ताराराणी चौकात आगमन होणार आहे. त्या ठिकाणी सकल मराठा समाजाकडून त्यांचे स्वागत केले जाणार आहे. दसरा चौकात आल्यानंतर ते राजर्षीं छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते दसरा चौक येथे सभा घेणार आहेत. तेथे मराठा आरक्षण संदर्भात त्यांची तोफ धडाडणार आहे.

Manoj Jarange Patil
Sharad Pawar News : शरद पवारांची अभिजित पाटलांना 'एअर लिफ्ट'!, बारामती-कापसेवाडी सफरीत नेमकी काय चर्चा ?

सभेसाठी दसरा चौकात सुसज्ज स्टेज व चार बाजूंचे रस्ते तसेच दसरा मैदानावर मराठा बांधवांना बसण्याची सोय केली आहे. सभा स्थानापासून एक किलोमीटर परिसरात साउंड सिस्टिमची व्यवस्था व आठ ठिकाणी स्क्रीनवर सभेचे प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. मराठा समाज बांधवांनी भशवे झेंडे, ऊन्हामुळे भगवी टोपी, नॅपकिन तसेच पाण्याची बाटली आणावी. सभास्थळी होणारा कचरा गोळा करण्यात येणार आहे. तसेच सभेनंतर गोंधळ न करता शांतपणे परतण्याचे आवाहन कोल्हापूर सकल मराठा समाजाच्या वतीने वसंतराव मुळीक यांनी केले आहे. (Maharashtra Political News)

Manoj Jarange Patil
Ajit Pawar NCP : महायुतीत लोकसभेचा तिढा; नऊ जागांसाठी अजित पवार गट आग्रही, 'या' नावांची चर्चा

क्रांती मोर्चाचा विरोध

'मनोज जरांगे पाटलांनी घेतलेल्या भूमिकेने मराठा समाजाची फसवणूक होत आहे. त्यांनी ज्येष्ठ वकिलांचा सल्ला घ्यावा. संघटनाही मदतीला येऊ शकतात. सल्ला घेऊनच भूमिका जाहीर करावी. जरांगे-पाटलांच्या भूमिका रोज बदलतात,' असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ता दिलीप पाटील यांनी केला आहे. त्यामुळे कोल्हापूरचा जरांगे पाटलांचा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे.

संशोधक विद्यार्थ्यांची भेट घेणार

सारथीच्या 2023 च्या फेलोशिप मिळावी, या मागणीसाठी १९ दिवसांपासून सारथी उपकेंद्राबाहेर विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू आहे. सभेच्या ठिकाणी हे विद्यार्थी उपस्थित असणार आहेत. त्यांची भेट मनोज जरांगे पाटील घेण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange Patil
Balasaheb Thackeray Death Anniversary : शिवतीर्थावर कडेकोट बंदोबस्त; ५० अधिकारी, ३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com