Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsarkarnama

Maratha Reservation : कऱ्हाडला जरांगे- पाटलांची तोफ आज धडाडणार; आरक्षणासाठी मराठा एकवटला

Karad Maratha Morcha : सायंकाळी सात वाजता कऱ्हाडला छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सभा होणार आहे.
Published on

-हेमंत पवार

Maratha Reservation News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर दौऱ्यावर असणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांची आज (शुक्रवारी) सायंकाळी सात वाजता कऱ्हाडला सभा होणार आहे.

त्यासंदर्भात पोलिस प्रशासन आणि मराठा समन्वयक यांची बैठक झाली. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सभेची तयारी पूर्ण झाली आहे. या सभेची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

मराठा समाजातील Maratha Reservation आबालवृद्धांशी संवाद साधण्यासाठी जरांगे- पाटील Manoj Jarange Patil येथे येत आहेत. छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये सायंकाळी सात वाजता सभा होईल. सभेला कऱ्हाड-पाटणसह जवळच्या कडेगाव, शिराळा, सातारा, खटाव तालुक्यांतील एक लाख मराठा बांधव येतील, असा अंदाज धरून संयोजकांनी नियोजन केले आहे.

त्यासंदर्भात नुकतीच पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, वाहतूक शाखेचे चेतन मछले यांच्याशी मराठा समन्वयकांची बैठक झाली. त्यात सुरक्षा, पार्किंग व अन्य वाहतुकीच्या विषयासंदर्भात चर्चा झाली.

नो पार्किंग झोन..

साईबाबा मंदिर ते छत्रपती शिवाजी स्टेडियमचे दक्षिण गेट रस्ता आणि विजय दिवस चौक ते बदियानी बंगला या परिसरात नो पार्किंग झोन राहील. त्या परिसरात एकही वाहने लावू दिले जाणार नाही.

Manoj Jarange Patil
Satara Political News : कृष्णेच्या पाण्याची चोरी; स्वाभिमानी शेतकरी घेणार जलसमाधी

कऱ्हाडकर जपणार बांधिलकी

मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी कऱ्हाड, पाटण, माण, खटाव, सातारा, कडेगाव, वाळवा, शिराळा या तालुक्यांतून मराठा बांधव, भगिनी येणार आहेत. त्यांच्या वाहनांची संख्याही जास्त असणार आहे. त्यांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागा मिळावी, याचा विचार करून शहरातील मराठा बांधवांनी जरांगे-पाटील यांच्या सभेला पायी चालत येण्याचा निर्धार केला आहे.

असा आहे पोलिस बंदोबस्त

पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामध्ये दोन पोलिस निरीक्षक, २३ पोलिस अधिकारी, १८० पोलिस कर्मचारी, होमगार्ड २५, दंगा काबू पथक एक व साध्या वेशातील विविध पोलिसांची पथके तैनात राहील.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation: मराठा आंदोलनामागे कोण ते राज ठाकरेंनी शोधून काढावं; जरांगे पाटलांचे आव्हान

येथे करा वाहन पार्किंग...

मसूर, ओगलेवाडीकडून येणाऱ्या वाहनांसाठी

दुचाकी पार्किंग : * राम मंदिर ते श्री नलवडे घर- दुचाकी पार्किंग टू व्हीलर पार्किंग * राम मंदिर कॉटेज हॉस्पिटल भिंत- दुचाकी पार्किंग * विठामाता हायस्कूल परिसर

चारचाकी पार्किंग : * पारस बंगला ते कॉटेज हॉस्पिटल भिंत * विरंगुळा बंगला ते एलआयसी ऑफिस * विरंगुळा बंगला ते दिलीप जाधव बंगला * शिवाजी हायस्कूलचा परिसर * डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण * श्री हॉस्पिटलसमोरील मोकळी जागा * वाखाण भागातील अंतर्गत रस्ते Maharashtra Political News

Manoj Jarange Patil
Pune Crime News : पुण्यात 'कोयता गँग'ची हिंमत आणखी वाढली; आता खडकी, चंदननगर भागात तरुणांवर हल्ला!

कार्वे, रेठरे, वाठारकडून येणाऱ्या वाहनांसाठी : * उर्दू शाळा मैदान परिसर * बैल बाजार - मार्केट यार्ड तळ * कल्याणी मैदान परिसर

उंडाळे, ओंड, विंगकडून येणाऱ्या वाहनांसाठी : * पी. डी. पाटीलसाहेब उद्यान परिसर * वॉटर सप्लाय परिसर पंकज लॉनशेजारी

उंब्रज, पाटणकडून येणाऱ्या वाहनांसाठी : * लाहोटी मैदान पंकज लॉनशेजारी * दैत्यनिवारिणी मंदिर परिसर * साई मंदिर शिवतीर्थ दत्त चौक परिसर

Edited By : Umesh Bambare

Manoj Jarange Patil
Bjp News Mumbai : देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींची मुंबईत बैठक; चर्चेचा विषय गुलदस्त्यात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com