Dhananjay Munde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Munde : गेल्या वर्षभरातील संकटांबाबत धनंजय मुंडेंचं विधान; ‘प्रारब्ध कोणाला चुकलंय...देवावरही संकटं...’

NCP Leader Statement : पंढरपुरात विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर धनंजय मुंडेंनी संकटांवर भाष्य केले. संकटे जाणूनबुजून आणली गेली, मात्र नववर्षात ती दूर झाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Vijaykumar Dudhale

Pandharpur, 01 January : गेली वर्षभरापासून राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडलेले माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात हजेरी लावून विठ्ठलाचे दर्शन घेतले. विठ्ठलाच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तसेच, संकटं तर देवावरही आली होती. प्रारब्ध कोणाला चुकले नाही, आपण तर माणूस आहोत. आमच्यावर जाणूनबुजून ही संकटं आणली गेली होती. नव्या वर्षात ही संकटं दूर झाली आहेत, असेही मुंडेंनी स्पष्ट केली.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी माजी मंत्री मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून ते काहींसे राजकीय विजनवसात गेल्यासारखी परिस्थिती होती. मात्र, करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेली याचिका फेटाळून लावली आहे. त्यानंतर मुंडे ३१ डिसेंबर रोजी विठ्ठलाच्या दर्शनसासाठी पंढरपुरात (Pandharpur) आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आलेल्या संकटांवर भाष्य केले.

मागील वर्षात माझावर अनेक लोकांनी जाणीवपूर्वक संकटं आणली होती. पण जुने वर्षे संपले, त्याबरोबरच आलेली सगळी संकटही संपली आहेत. नवीन वर्ष राज्यातील प्रत्येक माणसाला सुख-समृद्धीचे जावे, असे साकडे आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचेही धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी स्पष्ट केले.

प्रारब्ध कोणालाही चुकलेले नाही. संकटं तर देवावरही आली होती. आपण तर माणूस आहोत. जुन्या वर्षात काही लोकांनी मला अडविण्यासाठी जाणीवपूर्वक संकटे आणली होती. ती संकटं नैसर्गिक नव्हती, तर मुद्दामहून मला संकटात टाकायची म्हणून आणली गेली होती. जुने वर्ष संपले असून आता नव्या वर्षांत संकटही संपली आहेत, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला.

बऱ्याच वर्षांनंतर पंढरपुरात आज विठुरायाचे दर्शन झाले आहे. विठ्ठलाचे दर्शनाने समाधान वाटले आहे. शेतकऱ्यांवरची सर्व संकटे टळू दे, महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची प्रगती होऊ दे. तसेच नवे वर्ष सुखाचे, समाधाचे जाऊ दे, असे साकडेही आपण विठ्ठलाला घातल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT