Laxman Mane  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Laxman Mane : '10 वर्षे मोदी सरकारकडून जनतेच्या मतांची चोरी, ईव्हीएम...' : लक्ष्मण मानेंचा गंभीर आरोप

उमेश भांबरे

Satara News : "कोणतेही बटण दाबले की मत कमळाला जाते, त्यामुळे हे 'ईव्हीएम' मशीन बोगस असून ते हॅक होते. या यंत्राच्या माध्यमातून मोदी सरकार गेली 10 वर्षे जनतेच्या मतांची चोरी करीत आहे," अशी जोरदार टीका माजी आमदार लक्ष्मण माने यांनी मोदी सरकारवर केली. तसेच आता 'ईव्हीएम हटाओ व देश बचाओ'चा नारा आम्ही दिला आहे. आगामी निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.

विविध पक्ष, संघटनांनी आज माजी आमदार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली 'ईव्हीएम' मशीनची सातारा शहरातून अंत्ययात्रा काढून केंद्रातील व राज्यातील सरकारचा निषेध नोंदवला व 'ईव्हीएम' हटाओचा नारा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजवाडा येथून ही अंत्ययात्रा सुरू होऊन ती सातारा शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. येथे मोर्चात सहभागी विविध पक्ष, संघटनांनी केंद्र व राज्यातील सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. या आंदोलनात काँग्रेसचे बाळासाहेब शिरसट, मनोज तपासे, राष्ट्रवादीचे लक्ष्मण माने, आम आदमी पार्टीचे सागर भोगावकर, परिवर्तनवादी संघटनेचे विजय मांडके, वंचित बहुजन आघाडीचे बाळकृष्ण देसाई, ओबीसी संयुक्त संघटनेचे हौसेराव धुमाळ, सलोखा संघटनेचे मिनाज सय्यद, भटक्या-विमुक्त संघटनेचे नारायण जावळीकर आदींसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

लक्ष्मण माने म्हणाले, "कोणतेही बटण दाबले तरी मत कमळाला जात आहे. हे यंत्र हॅक होतं, हे यंत्र चोरी करते. या यंत्रामार्फत मतांची चोरी होते. मी मतदार असून मला अमक्या पक्षाला मत द्यायचे आहे, पण बटण दाबले की मला पाहिजे त्या उमेदवाराला जात नसून ते मत कमळालाच जाते. मोदी सरकार हे बोगस सरकार आहे, 10 वर्षे हे सरकार काम करीत आहे. या सरकार व यंत्रावर आमचा विश्वास नाही."

दिल्लीच्या जंतरमंतरवर हजारो विधिज्ञ बसले असून ते म्हणतात, की ईव्हीएम मशिन बोगस असून ते हॅक करता येते. त्यामुळे आता बॅलेट पेपरवर मतदान व्हावे, अशी आमची मागणी आहे. जगभर मतदानासाठी बॅलेट पेपरच वापरत आहेत. ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून आमच्या मतांच्या चोऱ्या होत असून यातून कोट्यवधी लोकांची फसवणूक चालू आहे. या चोऱ्या हे मशीन बंद होईल, त्यावेळीच बंद होतील. या मशिनची आम्ही अंत्ययात्रा काढली आहे, अशी टीका माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केली.

(Edited By : Ganesh Thombare)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT