Rajan Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajan Patil Politic's : राजन पाटलांनी राज्यात पुन्हा बाजी मारली; अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून दाखवली

Angar Nagar Panchayat Election Unopposed : अनगर नगरपंचायतीच्या 17 ही जागा बिनविरोध झाल्या असून परंपरा कायम राहिली. राजन पाटील भाजपमध्ये गेल्यानंतरही प्रभाव अबाधित राहिला. मात्र नगराध्यक्षपदासाठी दोन अर्जांमुळे राजकीय उत्सुकता वाढली आहे.

Vijaykumar Dudhale
  1. अनगर नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १७ अर्ज दाखल झाल्याने सर्व नगरसेवक बिनविरोध निवडले गेले, फक्त नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज आल्याने तिथे निवडणूक आवश्यक झाली.

  2. राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोधची परंपरा कायम राखली असून १७ जागा बिनविरोध झाल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

  3. उज्वला थिटे यांनी पहाटेच नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरल्यामुळे प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड होऊ शकली नाही, त्यामुळे फक्त नगराध्यक्षपदावर सामना पेटला आहे.

Solapur, 17 November : मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी सतराच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. माजी आमदार राजन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतरही बिनविरोधची परंपरा कायम राखली आहे.

नगरसेवकपदाच्या 17 जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच राजन पाटील समर्थकांनी अनगरमध्ये (Angar) गुलाल उधळला आहे.

अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. संपूर्ण नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) समर्थकांची तयारी होती. मात्र, नगराध्यक्षपदासाठी उज्वला थिटे यांनी पहाटेच जाऊन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राजन पाटील यांच्या धाकट्या सूनबाई प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड होऊ शकली नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आलेले राजन पाटील यांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखली आहे. त्यातून अनगर नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १७ च उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. अनगर नगरपंचायत बिनविरोध करून राजन पाटील यांनी भाजपला विशेष भेट दिल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही अनगर ग्रामपंचायत, मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ आदी सहकारी संस्थांच्या निवडणुका राजन पाटील यांनी बिनविरोध केल्या आहेत. आजही संपूर्ण राज्यातून राजन पाटील यांनी अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.

माजी आमदार बाबुराव पाटील यांच्यापासून अनगर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा चालत आली आहे. बाबूराव पाटील यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव माजी आमदार राजन पाटील आणि आता त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी अनगरची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा कायम राखली आहे. यंदा मात्र नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली असली तरी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लागली आहे.

1. अनगर नगरपंचायतीत किती जागा बिनविरोध झाल्या?

– एकूण १७ पैकी १७ नगरसेवक जागा बिनविरोध निवडल्या गेल्या.

2. नगराध्यक्षपदासाठी किती अर्ज दाखल झाले?

– नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले.

3. बिनविरोध परंपरा कोणाच्या नेतृत्वाखाली कायम राहिली?

– माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा कायम ठेवली गेली.

4. प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड का झाली नाही?

– कारण उज्वला थिटे यांनी पहाटेच नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT