Sambhajiraje chhatrapati sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

SambhajiRaje : '2009 ला दिलेल्या जखमा विसरलेलो नाही!'; संभाजीराजेंचा निशाणा कुणावर ?

Rahul Gadkar

Kolhapur News : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.एकीकडे आरक्षणावरुन आरोपांच्या फैरी झडत असतानाच दुसरीकडे कोल्हापूरमध्ये महाडिक- पाटील वादाचा भडका उडाला आहे. याचदरम्यान, आता माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी सूचक विधान करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

संभाजीराजे छत्रपती(SambhajiRaje) यांचे कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून सरप्राईज चेहरा असेल, असे विधान केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सूचक विधान करून कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे.

लोकसभा निवडणुकीवरून बोलताना, 2009 ला दिलेली जखमी अजून विसरलेलो नाही. त्याला मी वार समजणार नाही आणि आमच्यावर कोणी वार करू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हाला सर्व काही कळेल असे विधान करून खळबळ उडून दिली आहे.

स्वराज्यबाबत सकारात्मक चर्चा आहे. संभाजीराजे लढणार का नाही? हे वेळच ठरवेल. कोल्हापूर, नाशिक का? संभाजीनगर मध्ये निवडणूक लढवणार हे वेळचं ठरवेल. कोण जास्त प्रेम दिल तिथे संभाजी राजे उभारणार, असल्याचे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी चर्चेसाठी सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत, असेही सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या वादावर बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी दोघांनाही सबुरीचा सल्ला दिला आहे. समाजात राहत असताना दोघांनीही सुखाने राहिले पाहिजे. दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी त्याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT