Solapur,02 June : पुणे जिल्ह्याच्या मुळशीतील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे हुंडाबळीची नव्याने चर्चा होताना दिसत आहे. राजेंद्र हगवणे आणि त्याच्या मुलांनी वैष्णवीचा हुंड्यासाठी प्रचंड छळ केल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे. वैष्णवीच्या लग्नात हगवणे यांनी हुंड्यात फॉर्च्युनर गाडी घेतल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर अनेक फॉर्च्युनर गाडीमालकांकडे संशयाने पाहिले जात आहे. त्यावर आता शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे यांनी आयडियाची कल्पना लढवली आहे. ‘हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धु धू धुतलंय; पण अतुलभाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय,’ असे गाडीच्या पाठीमागे लिहिले आहे.
वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच मुळशी तालुक्यात घडली आहे. राजेंद्र हगवणे याने आपल्या मुलाच्या लग्नात वैष्णवीच्या आई वडिलांकडून हुंड्यात फॉर्च्युनर गाडी घेतल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. तसेच, हगवणे कुटुंबाने वैष्णवी हिचा छळ करून अनेक गोष्टींची मागणी तिच्या आईवडिलांकडे मागितल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.
हगवणे यांच्यामुळे अनेक फॉर्च्युनर मालकांकडे संशयाने पाहिले जात आहे. ‘हुंड्यात घेतली का, सासरकडून गिफ्ट’कडे अशा कमेंट केल्या जात आहेत. विशेषतः हॉटेलच्या बाहेर व इतर ठिकाणी फॉर्च्युनर गेल्यास नागरिक वेगळ्या नजरेने फॉर्च्युनर गाडीकडे (Fortuner Motor) पाहत असल्याचे दिसून येत आहे. काही लोक केवळ पाहतच नाही तर चित्रविचित्र टिकाटिपण्णी करताना दिसून येत आहेत.
हगणवणे कुटुंबामुळे फॉर्च्युनर वापरकर्त्यांकडे संशयित नजरेने पाहत आहेत. त्यावर सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे यांनी नामी शक्कल लढवली आहे. त्यांनी त्यांच्या फॉर्च्युनर गाडीच्या पाठीमागील काचावर गाडीच्या मालकीबाबत स्पष्टपणे लिहिले आहे. तशी तर मी मोठ्या घरची राणी. मात्र, बदनाम केले मला हगवणे यांनी! मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा. हगवणे कुटुंबामुळे नावं ठेवू लागलाय गाव सगळा!! अतुलभाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय; पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलंय!!!
याबाबत अतुल खुपसे म्हणाले, शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आमची स्वीफ्ट गाडीपासून आम्ही गाडी वापरण्यास सुरुवात केली. गेली पाच-दहा वर्षांपासून आम्ही फॉर्च्युनरसारखी गाडी विकत घेण्याचा विचार करत होतो. डाळींब आणि उसाचे दोन ते तीन वर्षांचे पैसे जमा केले आणि फॉर्च्युनर गाडी विकत घेतली.
प्रवासात एखाद्या हॉटेलवर उतरलं तर समोरचा माणूस आम्हाला पहिल्यांदा विचारतो की गाडी कधी घेतली. आम्ही सांगितलं की, पुढचे म्हणतात की सासऱ्याला दाबला की सासऱ्याकडून घेतली की तुम्हीच घेतली. म्हणजे पन्नास लाखांची फॉर्च्युनर गाडी घेऊन लोक असे प्रश्न विचारत असतील तर हगवणे म्हणजे मराठा समाजाला लागलेला काळिमा आहे.
बाहेर दाखवण्यासाठी गौतमी पाटलांसारखीला नाचवायचं आणि सुनेच्या आईवडिलांना त्रास द्यायचा. सुनेचा छळ करायचा आणि तिच्या आई वडिलांचं ओरबडून घ्यायचं. फॉर्च्युनरसारखी गाडी रुखवतात मागायची, अशामुळे फॉर्च्युनर बदनाम झाली. आम्ही उत्तर देऊन बेजार झालो. त्यामुळे फॉर्च्युनर विकायची वेळ आली. त्यामुळे आम्ही ज्या हगवणेमुळे फॉर्च्युनर बदनामी झाली. या वाक्यामुळे तरी लोक विचाराचे कमी करतील, असे वाटतंय, असे खुपसे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.