Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : साखर उताऱ्यात पालकमंत्र्यांच्या कारखान्याची आघाडी..

Balasaheb Desai Cooperative Sugar Factory : बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा 11.02 टक्के उतारा

Umesh Bambare-Patil

Satara News : जिल्ह्यातील 15 साखर कारखाने गळीत करत असून आतापर्यंत सर्व साखर कारखान्यांनी मिळून 34 लाख 63 हजार 57 टन उसाचे गाळप करून 30 लाख 70 हजार 340 क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. साखर उताऱ्यात पालकमंत्र्यांच्या बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे.

त्यांना 11.02 टक्के साखर उतारा मिळाला आहे. प्रत्येक वर्षी गाळप, साखर निर्मितीत सातारा (Satara) जिल्ह्यात आघाडीवर असलेला जरंडेश्वर कारखाना थोडा मागे पडल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यावर्षी उसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे शेतकरी आपला ऊस लवकरात लवकर कसा जाईल, याकडे लक्ष ठेऊन आहे. जिल्ह्यातील 7 खासगी व 8 सहकारी साखर कारखाने गाळप करत आहेत.

बहुतांशी कारखान्यांनी आपली क्षमता वाढवली आहे. दररोज 82 हजार 200 टन क्षमतेने कारखाने गाळप करत आहेत. आतापर्यंत कारखान्यांनी 34 लाख 63 हजार 52 टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून 30 लाख 70 हजार 340 क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सर्वांत जास्त गाळप कृष्णा कारखान्याचे झाले आहे.

त्यांनी 5 लाख 18 हजार 260 टन उसाचे गाळप केले असून, 4 लाख 80 हजार 560 क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सातारा जिल्ह्यातील ऊस गळीत हंगाम निम्म्यावर आला असून, आतापर्यंत सरासरी साखर उतारा 8.83 असला तरी सहकारी साखर कारखान्यांना यावर्षी चांगला साखर उतारा मिळत असल्याचे चित्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

साखर उताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. त्यांना 11.02 टक्के साखर उतारा मिळाला आहे. प्रत्येक वर्षी गाळप, साखर निर्मितीत जिल्ह्यात आघाडीवर असलेला जरंडेश्वर कारखाना थोडा मागे पडल्याचे चित्र आहे.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT