Girish Mahajan-Jayshinh Mohite Patil-Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Girish Mahajan Akluj Tour : भाजपचे संकटमोचक पुन्हा अकलूजमध्ये येणार; मोहिते पाटलांची नाराजी दूर करणार

Madha Lok Sabha Constituency : मोहिते पाटील यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी चिन्हावर लढण्याच्या हालचाली वाढल्या आहेत, त्यामुळे भाजपकडूनही डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 30 March : माढा लोकसभा मतदारसंघातील तिढा सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन पुन्हा एकदा अकलूजमध्ये येणार असल्याची माहिती आहे. उमेदवारीत डावलेल्या मोहिते पाटलांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे, त्यामुळे खडबडून जागे झालेल्या भाजपकडून मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी पुन्हा एकदा महाजन यांना ‘अकलूज वारी’साठी पाठविल्याचे सांगण्यात येत आहे. मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यात महाजन हे यशस्वी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Constituency) भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते. मात्र, भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे, त्यामुळे मोहिते पाटील हे नाराज झाले आहेत. नाराज मोहिते पाटील यांनी माढ्यातून कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहिते पाटील यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची (NCP) तुतारी हाती घेण्याचे ठरविले आहे. खुद्द जयसिंह मोहिते पाटील यांनी तसे विधान केले आहे. त्यामुळे माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे तुतारी चिन्हावर लढण्याच्या हालचाली वाढल्या आहेत, त्यामुळे भाजपकडूनही डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू आहेत.

मध्यंतरी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी आले होते. मात्र, मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यात महाजन यांना यश आले नव्हते. त्यावेळी त्यांना मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांची गाडी अडवली होती.

धैर्यशील आणि जयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्यातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. मात्र, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे सबुरीचे धोरण दिसत आहे. त्यांनी अजूनही ‘वेट ॲंड वॉच’ ही भूमिका घेतल्याचे दिसते. मुंबईत ते फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांशी चर्चा करत आहेत, त्यातून महाजन हे अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील आणि इतरांची समजूत काढण्यासाठी येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाजन यांच्या अकलूज दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT