Solapur, 09 January : पाकिस्तानच्या घटनेत लिहिलंय की एकाच समाजाचा माणूस पंतप्रधान, राष्ट्रपती बनू शकतो, इतर कोणी नाही. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात देशातील कोणताही नागरिक पंतप्रधान, मुख्यमंत्री, महापौर बनू शकतो. असदुद्दीन ओवेसीचे एक स्वप्न आहे की, हिजाब घालणारी मुलगी या देशाची पंतप्रधान बनेल. ते बघायला आपण असू किंवा नसू. पण तो दिवस नक्की येईल, असे विधान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.
सोलापूर महापालिका निवडणुकीत उभारलेल्या एमआयएम उमेदवारांच्या प्रचारार्थ असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांची आज (ता. 09 जानेवारी) नई जिंदगी परिसरात सभा झाला. त्या सभेत ओवेसींनी पंतप्रधानपदाबाबत भाष्य केले. ते म्हणाले, मुस्लिमांच्या विरोधात जो द्वेष पसरविण्यात येत आहे, तो जास्त दिवस चालणार नाही. द्वेष पसरविणारे एक दिवस नष्ट होतील.
तुम्ही एमआयएमच्या (AMIM) चार उमेदवारांना नई जिंदगी परिसरातून निवडून द्या. इथं 16 इंच पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येईल. शुगर फॅक्टरीचा रस्त्याचे कामही आमचे नगरसेवक करतील. परिसरासाठी एक ऍम्ब्युलन्सची व्यवस्था हे चार नगरसेवक मिळून करतील. इथे प्रॉपर्टी कार्ड मिळतं नाही, नोटरीवर जागा खरेदी केली जाते. मी तुम्हाला आश्वासन देतो इम्तियाज जलील स्वतः येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील. जर प्रशासनाने हे केलं नाही तर त्यांना जनआंदोलनाला सामोरं जावं लागेल, असा इशाराही ओवेसी यांनी दिला.
ओवेसी म्हणाले, इथल्या नागरिकांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करावेत लागतील, विशेषतः मुलींच्या शिक्षणाकडं लक्ष द्यावं लागेल. पैसा, भाषणाने कोणी ताकदवान होत नाही, चांगली वागणूक महत्वाची आहे. ते फक्त शिक्षणामुळेच होऊ शकेल. फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारखं नई जिंदगी परिसरातील मुलांना शिकवावं लागेल
ओवेसी म्हणाले, आमच्या युवा कार्यकर्त्याने इस्त्राईल प्रॉडक्टचा निषेध केला, तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला. बहुतेक FIR दाखल करणारा नेत्यानहूचा पुतण्या असेल, त्याचे नाव नेत्यानहूचा पुतण्या म्हणूनच केलं जाईल.
दुसऱ्या पार्टीतून लोकं लढत आहेत. पण त्यांच्या बुद्धीला कुलूप लागलं आहे. एमआएमचा इतिहास आहे की, त्याने ताकद असलेल्या लोकांच्या विरोधात लढाई लढली आहे, त्यामुळे 15 तारखेला पतंग चिन्हावर बटन दाबायचे आहे, असे आवाहनही असदुद्दीन ओवीसी यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.