Mahadev Jankar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahadev Jankar : खासदार होऊन दिल्लीला जाणारच; जानकरांनी एका शब्दातच सांगितलं...

Madha Loksabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असल्याचे बोलले जाते. मात्र, यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : रासपचे आमदार महादेव जानकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या वेळी महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विकासकामांचे उद्घाटन केले. या वेळी भाजपचे दक्षिणचे माजी आमदार अमल महाडिक उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी एक सूचक विधान केले आहे.

आमदार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांची एकीकडे भाजपवर टीका सुरू आहे, तर दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असल्याचे बोलले जाते. मात्र, जानकर यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. जानकर हे बारामती की माढामधून लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कोल्हापूर (Kolhapur) उपनगरातील फुलेवाडी रिंगरोड येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना, अमल महाडिक आणि माझे खूप चांगले संबंध आहेत. मला आमदार करताना अमल महाडिक यांची मोठी मदत झाली आहे. महाडिक यांनी मला मदत केली म्हणून आपण त्यांना 5 कोटी आणि जिल्ह्यात 6 कोटींचा निधी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माझा पक्ष छोटा आहे, महाडिक यांचा पक्ष मोठा आहे. त्यांच्या पक्षातील अजून एक नेता माझ्या पक्षात कसा येईल? यासाठी माझा प्रयत्न आहे.‌ राजकारणात आमचाही स्वार्थ आहे. भाजप (BJP), काँग्रेससारखे मोठे पक्ष आहेत. त्यांच्यावर छोट्या पक्षांनी अतिक्रमण केले पाहिजे, असे विधान आमदार जानकर यांनी केले.

खासदार होऊन लवकरच दिल्लीला जाणार आहे, त्यामुळे आणखी फंड देईन. महाडिक यांनी मला खासदार करण्यासाठी तन, मन, धन, द्यावं. महाडिक यांचं कामं चांगलं आहे, त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही जानकर यांनी दिली.

(Edited by Amol Sutar)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT