नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशातच या प्रयत्नांना एकनाथ शिंदे गटाने 'जोर का झटका' दिला आहे. शिवसेना संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांनी थेट लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे शिवसेनेचे आहेत, तर या मतदारसंघावर भाजप दावा करत आहे. अशातच शिवसेनेने तयारी सुरू केल्याने निवडणुकीआधी सत्ताधारी पक्षातच जुंपल्याचे दिसून येत आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघावर (Nashik Loksabha Constitueny) भाजपची पूर्वीपासून नजर होती. शिवसेनेतील फुटीनंतर भाजपने (BJP) थेट दावाच केला आहे. त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांशी पत्रव्यवहारदेखील केला होता. येत्या एक-दोन दिवसांत या संदर्भात जागावाटपाची चर्चा करावी, अशा सूचना होत्या. पण या तयारीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने झटका दिला आहे.
शिवसेनेचे (शिंदे) विभागीय संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Choudhary) यांच्या उपस्थितीत काल (1 मार्च) पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यात चौधरी यांनी पदाधिकाऱ्यांना नाशिक लोकसभा मतदारसंघात खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हेच उमेदवार असतील, असे संकेत दिले. सगळ्यांनी थेट निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
विशेषत: शहरातील नगरसेवकांनी सक्रिय न झाल्यास त्यांच्याबाबत वेगळा विचार करण्याचादेखील इशारा चौधरी यांनी दिला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अस्मिता देशमाने यांची महिला आघाडीच्या शहर प्रमुख म्हणून नियुक्तीदेखील करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेने (Shivsena) आता थेट निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीच्या घटक पक्षांतील राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीदेखील स्वतः उमेदवारी करण्याबाबत चाचपणी केली होती. निवृत्ती अरिंगळे यांनीही जनसंपर्क दौरा सुरू केला होता. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी जागावाटपात नाशिक मतदासंघांवर दावा केला होता. त्यांनी निवडणुकीची तयारी केली होती. या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने तगडा दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात खरी लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे. दोन महिन्यांपासून खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचारदेखील सुरू केलेला आहे. सध्या जिल्हा परिषद गटनिहाय विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन या निमित्ताने त्यांचा दौरा जोरात आहे.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.