Satyajeet Patankar-Shambhuraj Desai Sarakarnama
पश्चिम महाराष्ट्र

Desai Vs Patankar : पालकमंत्री शंभूराज देसाईंनी पाटणकरांना डिवचले; ‘नेतृत्व ते तात्पर्य का दाखवत नाही?’

Patan Political News : पाटण नगरपंचायतीच्या कामकाजावर शंभूराज देसाई यांनी टीका करत पदाधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवावे व जलद कामकाजाची मानसिकता विकसित करण्याची गरज असल्याचे सांगितले.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad, 19 April : पाटण नगरपंचायत ज्यांच्या ताब्यात आहेत, त्या नेतृत्वाने पदाधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये एखादी पाईपलाईन फुटल्यास दोन-चार तासांत दुरुस्त केली जाते. पाटणसारख्या ठिकाणी ते तात्पर्य का दाखवले जात नाही. त्यासाठी हिरिरीने काम करण्याची मानसिकता हवी असा टोला साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटणकर यांना नाव न घेता लगावला.

पाटण नगरवासीयांना पाणी मिळाले पाहिजे, यासाठी मी ठेकेदार आणि मुख्याधिकाऱ्यांना बोलावून तत्काळ काम मार्गी लावण्याचे सूचना देणार असल्याचेही पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai ) यांनी स्पष्ट केले.

साकुर्डी येथील शाळेच्या नूतनीकरण इमारतीच्या उद्‌घाटनानंतर शंभूराज देसाई बोलत होते. पाटण (Patan) शहरातील पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या विरोधकांच्या भूमिकेबाबत ते म्हणाले, मला कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. पाणीपुरवठा योजनेसाठी नगरपालिकेला दीड कोटींचा निधी होता. मात्र त्याची मुदत संपल्यानंतर अखर्चित राहिला होता. याबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री (कै) अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्याला त्यांनी तत्वता मान्यता दिली.

आता पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव दिला. नगरविकास विभागाने त्याला तत्काळ मान्यता दिली आहे. नगर प्रशासनाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर अधिकाऱ्यांना ही योजना मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, पाटण नगरपंचायत ज्यांच्या ताब्यात आहेत, त्या नेतृत्वाने पदाधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये एखादी पाईपलाईन फुटल्यास दोन-चार तासांत दुरुस्त केली जाते. पाटणसारख्या ठिकाणी ते तात्पर्य का दाखवले जात नाही. त्यासाठी हिरिरिने काम करण्याची मानसिकता हवी.

पाटण नगरवासीयांना पाणी मिळाले पाहिजे, यासाठी मी ठेकेदार आणि मुख्याधिकाऱ्यांना बोलावून तात्काळ काम मार्गी लावण्याचे सूचना देणार असल्याचे पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

आदर्श शाळांसाठी 100 कोटींचा निधी

जिल्हा परिषदेच्या शाळेमधून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून 100 कोटींचा निधी शाळांना दिला आहे. स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र योजनेलाही 153 कोटींचा निधीही देण्यात आला आहे. वस्ती साकुर्डीसारख्या शाळांमुळे जिल्हा परिषद शाळांचा पट घटणार नाही. पालकमंत्री असताना 2022 मध्ये प्राथमिक शाळांच्या पायाभूत सुविधांवर भर दिला होता. त्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक शाळा मॉडेल स्कूल म्हणून उभारल्या आहेत, असेही देसाई यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT