Udayanraje Bhosale News : उदयनराजेंकडून कऱ्हाड, पाटण टार्गेट; मागील वेळीची चूक या वेळी टाळणार...

Loksabha Election 2024 : उदयनराजेंनी 2019 च्या पोटनिवडणुकीत कमी मते मिळालेल्या कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSarkarnama

Satara Loksabha News : सातारा लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारीच्या अनेक याद्या जाहीर झाल्या. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. मात्र, तरीही खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. मात्र, मी लोकसभेचा उमेदवार म्हणूनच लोकांशी संवाद साधत आहे, असे जाहीर करून खासदार भोसले यांनी जिल्ह्यात संपर्क दौरा सुरू केला आहे. 2019 मध्ये पोटनिवडणुकीत उदयनराजेंना श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. उदयनराजेंनी त्यावेळी केलेल्या चुका या वेळी सुधारण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.

उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale ) 2019 च्या पोटनिवडणुकीत कमी मते मिळालेल्या कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. संपर्काअभावी मागीलवेळी झालेली चूक या वेळी टाळण्यासाठी खासदार भोसले यांनी मायक्रो प्लॉनिंग करुन कऱ्हाडचे दोन्ही मतदारसंघ आणि पाटणसाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे.

Udayanraje Bhosale
Satara Loksabha Constituancy : बारामतीकराकडून साताऱ्यात उमेदवारीचा श्रीगणेशा, उदयनराजे, शिंदे, बिचुकलेंनी नेले अर्ज !

सातारा जिल्ह्याची ओळख राष्ट्रवादी काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला अशी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासूनच या जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले विजयी झाले होते. मात्र, 2019 मध्येच राजीनामा देत उदयनराजेंनी भाजपकडून पोटनिवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली.

पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांच्या विजयात कऱ्हाड उत्तर, दक्षिण आणि पाटण मतदारसंघाचा वाटा मोठा होता. त्यामुळे आता खासदार भोसले यांनी या तिन्ही मतदारसंघांत भेटीगाठीवर जोर दिला आहे. त्यासाठी त्यांनी मायक्रो प्लॉनिंगही केले आहे.

खासदार पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा 87 हजार 717 मतांनी पराभव केला. या चुरशीच्या लढतीत खासदार पाटील यांना 6 लाख 36 हजार 620 तर उदयनराजे भोसले यांना 5 लाख 48 हजार 903 मते मिळाली. कऱ्हाड उत्तरमध्ये खासदार पाटील यांना 1 लाख 14 हजार 641 तर खासदार भोसले यांना 63 हजार 762 मते मिळाली. कऱ्हाड उत्तरने खासदार पाटील यांना सर्वाधिक 50 हजार 879 मतांची सर्वाधिक आघाडी दिली.

कऱ्हाड दक्षिणमध्ये खासदार पाटील यांना 31 हजार 849 मतांची आघाडी मिळाली होती. पाटील यांना पाटण मतदार संघामध्ये खासदार पाटील यांना 27 हजार 859 मतांचे मताधिक्य मिळाले. पाटील यांना 1 लाख 12 हजार 348 तर खासदार भोसले यांना 84 हजार 859 मते मिळाली. त्यामुळे खासदार पाटील यांना कऱ्हाड-पाटण तालुक्यांनी तारले होते. त्याचा विचार करुन खासदार भोसले यांनी मताधिक्य वाढवण्यासाठी संबंधित दोन्ही तालुके टार्गेट केले आहेत.

कऱ्हाड-पाटण मतदासंघ ठरतात निर्णायक कऱ्हाड तालुक्यात उत्तर आणि दक्षिण हे दोन मतदारसंघ आहेत. त्याचबरोबर त्याला लागूनच पाटण विधानसभा मतदारसंघ आहे. यातील कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात दोन लाख 98 हजार 303, उत्तरमध्ये दोन लाख 93 हजार 154 आणि पाटण मतदारसंघात दोन लाख 97 हजार 571 असे तिन्ही मतदारसंघात आठ लाख 89 हजार 28 मतदार आहेत. कऱ्हाड-पाटण तालुक्यातील उमेदवार असेल तर तालुक्याचा विचार करून मतदार संबंधित उमेदवाराला मतदान करतात. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघावरच उमेदवारांचा विजय ठरतो, असे यापूर्वीच्या निवडणुकीतील चित्र होते. त्यामुळे या मतदारसंघावरच सर्वांची भिस्त असणार आहे.

(Edited By Roshan More)

R

Udayanraje Bhosale
Sangli Loksabha Election : 'राजीव गांधींचे पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू निराधार आणि...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com