Baramati Bypoll Controversy : बारामतीत ‘नो एन्ट्री’, राहुरीत ‘फुल एन्ट्री’! गोपीचंद पडळकरांचा इशारा, “मी बोललो तर भूकंप येईल!”

BJP MLA Gopichand Padalkar takes a dig at MVA strategy of skipping Baramati while fielding a candidate in Rahuri during Akshay Kardile campaign : बारामती पोटनिवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला नाही, राहुरीत दिला आहे, यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.
Baramati Bypoll Controversy
Baramati Bypoll ControversySarkarnama
Published on
Updated on

Rahuri assembly election news : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा भाजप महायुतीकडून प्रचार शिगेला पोहोचला आहे. राहुरी अन् बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारक म्हणून 40 जण मैदानात उतरवले आहेत.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आज प्रचार दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना शरद पवार राष्ट्रवादी आणि 'मविआ'ने बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार दिलेला नाही. परंतु राहुरी पोटनिवडणुकीत दिला आहे, यावर बोलताना, आमदार पडळकर यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.

बारामतीत शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला नाही, परंतु राहुरी पोटनिवडणुकीत दिला आहे. यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी, 'जाऊ दे मी काय बोललो, तर वातावरण बिघडतंय, त्यामुळे मला काही बिघडवायचं नाही', असे म्हटलं आहे.

भाजपचा (BJP) आक्रमक चेहरा अन् पवारांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून पडळकरांकडे पाहिलं जाते. यातून आमदार रोहित पवारांविरोधात त्यांचे नेहमीच राजकीय द्वंद सुरू असता. यातूनच गोपीचंद पडळकर यांनी या प्रश्नावर सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

Baramati Bypoll Controversy
Rahuri Bypoll Clash : 'मविआ की भाजप?' फडणवीसांची सभा अन् तनपुरेंचा निर्णायक मेळाव्याच्या टायमिंगमुळे चर्चांना उधाण!

राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'कडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे आहे, तर महायुतीचे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले आहे. वंचित बहुजन आघाडीने देखील उमेदवार दिला असून, संतोष चोळके प्रतिनिधीत्व करत आहेत.

Baramati Bypoll Controversy
Rahuri By-Election : राहुरीची 28 वर्षांपूर्वीची पोटनिवडणूक; भाजपच्या कदमांचा 23 मतांनी विजय, दोनदा मतमोजणी

महायुतीने भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुरी आणि बारामतीत 40 नेते उतरवले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या सोमवारी राहुरीत प्रचार सभा होत आहे. 'मविआ'च्या शरद पवार राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी राहुरीत खासदार नीलेश लंके तळ ठोकून आहेत. 'वंचित'च्या उमेदवारासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांची दुसरी सभा झाली आहे.

हिंदू धर्माला लक्ष्य

नाशिक 'TCS' कंपनीतील धर्मांतर अन् लैंगिक शोषण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, शेकडो वर्षांपासून हिंदू धर्माला लक्ष्य केले जात आहे. महिलांचं शोषण, धर्मांतर तसेच ‘लव जिहाद’सारखे प्रकार सुरू असताना, आता ‘कॉर्पोरेट जिहाद’चे स्वरूप समोर आले आहे.

हिंदू-मुस्लिम वादाचा हा मुद्दा नसून...

अहिल्यानगर जिल्ह्यातही अशा घटना सातत्याने घडत असल्याचा दावा करताना, त्यांनी अमरावतीतील एका 19 वर्षीय युवकाकडे 180 व्हिडिओ सापडल्याचा मुद्दावर आमदार पडळकर यांनी भाष्य केलं. यापुढे मुलींच्या पालकांनी अन् नातेवाईकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. राजकारण किंवा हिंदू-मुस्लिम वादाचा हा मुद्दा नसून हिंदू धर्माचे रक्षण, महिलांच्या सन्मानाचा आणि संरक्षणाचा असल्याचे पडळकर यांनी म्हंटल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com